शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सी.एच.बी. प्राध्यापकांचे ‘पकोडा’ आंदोलन, मागण्यां मान्य न झाल्यास मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 20:50 IST

तासिका तत्त्वावरील (सी. एच. बी.) प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापूर विभाग शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाजवळ पकोडा आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोर्चा काढण्याचा इशारा सी. एच. बी. प्राध्यापक संघटनेने दिला. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. पी. माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देसी.एच.बी. प्राध्यापकांचे ‘पकोडा’ आंदोलनशिक्षण सहसंचालक कार्यालयाचे माने यांना निवेदन मागण्यां मान्य न झाल्यास मोर्चा

कोल्हापूर : तासिका तत्त्वावरील (सी. एच. बी.) प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापूर विभाग शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाजवळ पकोडा आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोर्चा काढण्याचा इशारा सी. एच. बी. प्राध्यापक संघटनेने दिला. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. पी. माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक क्षेत्राचा मोलाचा वाटा असताना या क्षेत्रात अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांना शैक्षणिक वर्षाच्या शेवटी ५० हजार ४०० रुपये मानधन दिले जाते. ते देऊन एका उच्चशिक्षित, नवोदित प्राध्यापकांचा शासन अपमान करीत आहे. काही ठिकाणी किमान वेतन कायद्याच्या तरतुदींइतकेही वेतन दिले जात नाही. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी सी. एच. बी. प्राध्यापक संघटनेने राजाराम कॉलेज परिसरातील शिक्षण सहसंचालक कार्यालयावर पकोडा आंदोलन केले.यावेळी राज्य संघटक गिरीश फोंडे म्हणाले, तुटपुंज्या पगारामुळे प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात. विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी हे कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. पी. माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आंदोलनात प्रा. सुनील भोसले, प्रा. बबन पाटोळे, प्रा. अमोल महापुरे, प्रा. अविनाश पाटील, प्रा. प्रकाश कांबळे, प्रा. सचिन देठे, प्रा. अशोक कोळेकर, प्रा. रोहित बारशिंगे, आदी प्राध्यापकांचा सहभाग होता.

या आहेत मागण्या...

  1. * तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना दिले जाणारे तासिका मानधन २४० रुपयांऐवजी ६०० रुपये करावे.
  2. * तासिका मानधन हे सी. एच. बी.धारकांच्या बँक खात्यात जमा करावे.
  3. * मानधन प्रत्येक महिन्याला मिळावे. सध्या हे वर्षा-दोन वर्षांतून एकदम दिले जाते.
  4. * सी. एच. बी.धारकांना दिलेल्या तासिकांव्यतिरिक्त जादा काम केल्यास त्याचे मानधन मिळावे.
  5. * परीक्षा विभाग किंवा अन्य कोणत्या विभागामध्ये सदस्य म्हणून काम केल्यास त्याचे मानधन मिळावे.
  6. * रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी. सध्या राज्यात प्राध्यापकांच्या नऊ हजार जागा रिक्त आहेत.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक