शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भारत राखीव बटालियनच्या समादेशकाची बदली : लाचप्रकरणाची कारवाई बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 12:10 IST

कोल्हापूर येथील ‘भारत राखीव बटालियन ३’चे प्रमुख समादेशक खुशल व्ही. सपकाळे यांची नांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. यासंबंधीचा आदेश शासनाने शुक्रवारी काढला. चाळीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणामध्ये सपकाळे यांचे नाव पुढे आले आहे.

ठळक मुद्देभारत राखीव बटालियनच्या समादेशकाची बदली : लाचप्रकरणाची कारवाई बारगळलीनांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

कोल्हापूर : येथील ‘भारत राखीव बटालियन ३’चे प्रमुख समादेशक खुशल व्ही. सपकाळे यांची नांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. यासंबंधीचा आदेश शासनाने शुक्रवारी काढला. चाळीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणामध्ये सपकाळे यांचे नाव पुढे आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोनवेळा नोटीस पाठवूनही ते हजर राहिले नाही. त्यांची चौकशी सुरू असताना अचानक बदली झाल्याने लाचप्रकरणात त्यांचे नाव वगळून कारवाईचा टप्पा पूर्ण केल्याची चर्चा रंगली आहे.आपल्याच कार्यालयातील जवानांकडून चाळीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ‘भारत राखीव बटालियन ३’च्या सहायक समादेशकासह सहा संशयितांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. याप्रकरणी संशयित पोलीस निरीक्षक मधुकर श्रीपती सकट, लिपिक राजकुमार रामचंद्र जाधव, सहायक फौजदार रमेश भरमू शिरगुप्पे, आनंदा महादेव पाटील, पोलीस शिपाई प्रवीण प्रधान कोळी यांना अटक झाली.

शासनाने या सर्वांना खात्यातून निलंबित केले. सहायक समादेशक मनोहर नारायण गवळी याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. बटालियनचे प्रमुख समादेशक सपकाळे यांचे नाव लाचेच्या मागणीमध्ये पुढे आले आहे. त्यांच्याशी तक्रारदाराचे पैसे दिल्यासंबंधीचे बोलणे झाल्याचे कॉल रेकॉर्डही पथकाच्या ताब्यात आहे.

त्यांच्या कॉलचे सात सीडीआर उपलब्ध झाले आहेत. नेमके काय बोलणे झाले, त्याचे रेकॉर्ड झाले असून पोलीस कसून चौकशी करीत आहेत. मोबाईल संभाषण झालेले नंबर कोणाचे आहेत, याची माहिती पथक घेत असल्याचे तपास अधिकारी गिरीश गोडे यांनी सांगितले.नोटीस पाठवूनही हजर नाहीसहायक फौजदार आनंद पाटील याने समादेशक सपकाळे यांना फोन करून तक्रारदार शेंडगे यांच्याशी बोलणे करून दिले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे २७ हजार रुपये सपकाळे यांच्या खासगी एजंटाच्या बँक खात्यावर भरण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी याच्या ताब्यात दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

सपकाळे यांची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले होते. कारवाई १७ जुलैला झाली. सपकाळे यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोनवेळा नोटीस पाठवूनही ते हजर राहिले नाही. लाचलुचपत विभागाचे अधिकारी कार्यालयात बसून त्यांची प्रतीक्षा करीत असतानाच सपकाळे यांची नांदेडला बदली झाली; त्यामुळे हे प्रकरण दडपल्याची चर्चा आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर