शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘चंदगड भवन’वरून सदस्य, सीईओंचा आवाज वाढला, शौमिका महाडिक यांनी अखेर दिला ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:59 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या ‘चंदगड भवन’वरून चंदगडचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा शुक्रवारी आवाज वाढला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याच दालनात त्यांच्यासमोरच दुपारी हा प्रकार घडला. अखेर महाडिक यांनीच मध्यस्थी करीत हे भवन बांधण्याबाबतच्या ठरावाची प्रत संंबंधितांना दिली.

ठळक मुद्दे‘चंदगड भवन’वरून सदस्य, सीईओंचा आवाज वाढलाशौमिका महाडिक यांनी अखेर दिला ठराव

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या ‘चंदगड भवन’वरून चंदगडचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा शुक्रवारी आवाज वाढला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याच दालनात त्यांच्यासमोरच दुपारी हा प्रकार घडला. अखेर महाडिक यांनीच मध्यस्थी करीत हे भवन बांधण्याबाबतच्या ठरावाची प्रत संंबंधितांना दिली.गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘चंदगड भवन’ बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र या प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. जिल्हा परिषदेचे सदस्य कल्लाप्पा भोगण आणि सदस्या विद्या पाटील यांचे पती विलास पाटील यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. या दोघांनाही ही बाब समजल्यानंतर त्यांनी शुक्रवारी अध्यक्षा महाडिक यांची भेट घेतली.यानंतर मित्तल यांनाही निरोप देण्यात आला. ते अध्यक्षांच्या दालनामध्ये आल्यानंतर भोगण आणि पाटील यांनी त्यांना ‘तुम्ही नकारात्मक भूमिका का घेता?’ अशी विचारणा केली. ‘सर्वसाधारण सभेने ठराव मंजूर केल्यानंतरही तुम्ही अशी भूमिका का घेतली? आम्ही स्वनिधीतील पैसे देत असताना तुमचा आक्षेप का,’ अशी विचारणा या दोघांनी केली. याला मात्र मित्तल यांनी आक्षेप घेतल्याचे समजले. हा निधी जिल्हा परिषदेचा आहे, अध्यक्षांचा आहे, असे त्यांनी सांगितले. जरी सभेने ठराव केला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझी आहे, असे मित्तल म्हणाले.यावेळी विलास पाटील यांनी आवाज वाढविल्यानंतर मित्तल यांनीही संताप व्यक्त केला. हा शासनाचा पैसा आहे. कुठेतरी दोन खोल्या बांधून आपण काहीतरी करणार असू तर ते करून चालणार नाही. मला विचारणारे कुणीतरी आहे, अशा स्पष्ट शब्दांत मित्तल यांनी आपली भूमिका मांडली.

अखेर अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी या वादात मध्यस्थी केली. हे भवन व्हायला हवे आणि ते जिल्हा परिषदेची प्रक्रिया पूर्ण करून व्हावे आणि भविष्यातही त्याचा उपयोग व्हावा, अशा पद्धतीने हे काम करून घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच सर्वसाधारण सभेतील ठरावाची प्रतही यावेळी भोगण यांच्याकडे देण्यात आली.

पाच मजली इमारतीसाठी डिझाईन करायावेळी अमन मित्तल यांनी ही इमारत पाच मजली होईल, अशा पद्धतीने त्याचा पाया काढून तसे डिझाईन करण्याची सूचना केली. माझा ‘चंदगड भवन’ला विरोध नाही. मात्र मोक्याची कोट्यवधी रुपयांची जिल्हा परिषदेची जागा देताना त्या जागेवर आणखी मजले वाढविता यावेत असेच हे बांधकाम हवे. सदस्यांना चांगल्या दर्जाच्या खोल्या निवासासाठी मिळाव्यात, अशी आपली भूमिका असल्याचे यावेळी मित्तल यांनी सांगितल्याचे समजते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर