शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

कोल्हापूर : वाहतूक शाखेच्या महिला पोलीसावर चाकु हल्ला, आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:33 IST

भवानी मंडप परिसरात दूचाकी लावू नको असे सांगितलेच्या रागातून तरुणाने शहर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलचा हात पकडून चाकुने वार केला. रुपाली यल्लाप्पा जोंधळे (वय २८, रा. चिंचवाड, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देवाहतूक शाखेच्या महिला पोलीसावर चाकु हल्ला, आरोपीस अटक भवानी मंडप येथील घटना : दूचाकी बाजूला घेतलेचा राग

कोल्हापूर : भवानी मंडप परिसरात दूचाकी लावू नको असे सांगितलेच्या रागातून तरुणाने शहर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलचा हात पकडून चाकुने वार केला.

रुपाली यल्लाप्पा जोंधळे (वय २८, रा. चिंचवाड, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणास जुनाराजवाडा पोलीसांनी अटक केली. संशयित शहनाज महमद बागवान (वय २०, रा. सी वॉर्ड, बागवान गल्ली, बिंदू चौक) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, कॉन्स्टेबल रुपाली जोंधळे ह्या सोमवारी सकाळी नऊ पासून भवानी मंडप मेन राजाराम हायस्कूलचे प्रवेशद्वारासमोर वाहतूकीचे बंदोबस्ताचे काम करीत होत्या. दूपारी साडेबाराच्या सुमारास श्हनाज बागवान हा दूचाकी (एम. एच. ०८ सी. सी. २१६) घेवून याठिकाणी आला.

भवानी मंडप येथील राजाराम हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर तो दूचाकी पार्किंग करुन जावू लागला. यावेळी जोंधळे यांनी दूचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्याने ऐकले नसल्याने त्या स्वत: दूचाकी बाजूला घेवू लागल्या असता जोंधळे याने त्यांचा हात पकडून खिशामध्ये लपवलेला चाकूने त्यांच्या उजव्या हातावर वार केला.

हल्ल्यानंतर तो पळून जावू लागला. जोंधळे यांनी आरडाओरड करताच येथील नागरिकांनी त्याला पकडले. हाकेच्या अंतरावरील जुनाराजवाडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला अटक केली. जखमी जोंधळे यांचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर