शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बदलणार नाही : चंद्रकांत पाटील यांनी टाकला चर्चेवर पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:22 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षे बदलणार नाही असे स्पष्ट करत अध्यक्षबदलाच्या चर्चेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पडदा टाकला.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष अडीच वर्षे बदलणार नाही अध्यक्षबदलाच्या चर्चेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाकला पडदा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षे बदलणार नाही असे स्पष्ट करत अध्यक्षबदलाच्या चर्चेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पडदा टाकला.प्रेस क्लबच्या कार्यक्रमावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मुळात लोकशाहीमध्ये अशा पध्दतीने दरवर्षी पदाधिकारी बदलणे योग्य नाही. मात्र आमच्याबरोबरच जे घटक पक्ष आहेत त्यांना त्यांचे पदाधिकारी बदलण्यासाठी मुभा दिली आहे. परंतू अध्यक्ष भाजपचा आहे. आम्ही अडीच वर्षे त्यात बदल करणार नाही.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपच्यावतीने अनेक प्रभावी नेत्यांना पक्षात समाविष्ट करून घेतले होते. त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते अरुण इंगवले यांचाही समावेश आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इंगवले यांना त्यावेळी अध्यक्ष करण्याचा ‘शब्द’ दिला होता.

मात्र, निवडणूक निकालानंतर सत्तास्थापन करण्यासाठी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी सव्वा वर्षांचा कालावधी ठरविण्यात आला. त्यावर एकमत होऊन जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपची सत्ता आली. 

अध्यक्षपदाला दीड वर्षांचा कालावधी लोटला असल्याने अध्यक्ष बदलाच्या कारणावरून अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे शौमिका महाडिक यांच्या राजीनाम्याबाबत महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी राजीनामा देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री पाटील व भाजप सदस्य आणि मित्रपक्ष यांच्याशी चर्चा करून इंगवले यांना अध्यक्षपदी संधी देण्यात येणार असल्याचे शेळके यांनी सांगितले होते.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील