शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

कोल्हापूर : ‘मंगळ’ मोहिमेच्या यशस्वितेचा आनंदोत्सव

By admin | Updated: September 25, 2014 00:20 IST

शहरात आतषबाजी : विविध संघटनांनी साखर-पेढे वाटले

घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठे महसूल उत्पन्नाचे गाव म्हणून घाटनांदूरची ओळख आहे. येथील ३३ के.व्ही. उपकेंद्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात नियोजनाचा अभाव आहे. वसुली असूनसुद्धा वीज पुरवठ्याचे तीन- तेरा झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. येथील केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.घाटनांदूर येथे दोन हजारच्यावर वीज ग्राहक आहेत. या ठिकाणच्या वीजबिल वसुलीचे प्रमाणही ९० टक्केंच्यावर आहे. मात्र वीज वितरण कंपनीने चोवीस तास वीज पुरवठ्याच्या आपल्याच घोषणेकडे दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला तर कसलेही दुरूस्ती साहित्य येथे उपलब्ध नाही. डी.पी.चे फ्यूज, केबल सुद्धा शेतकऱ्यांनाच खरेदी करावे लागत आहे. मान्सूनपूर्व दुरूस्तीची कामे या भागात झालेली नसल्याने अनेक रात्री अंधारात काढाव्या लागलेल्या आहेत. येथील भगतसिंग नगरात उपकेंद्राच्या मागे सहा महिन्यांपूर्वी सिमेंट पोल मोडलेला आहे. तारांवरच तो खांब आज तग धरून आहे. मोडलेला खांब बदलण्यास येथील अभियंत्यांना मात्र वेळ नाही. नवाबवाडीला जाणाऱ्या रोडवरील नवीन कॉलनीत विद्युत खांबावरील तारा हाताला येत आहेत. या तारांबद्दल येथील रहिवाशी असलेले बुरांडे यांनी लेखी तक्रारही दिली आहे. मात्र याची अद्याप दखल घेतली गेलेली नाही. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास या जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.उपकेंद्रातील ५ एमव्हीएचे ट्रान्सफार्मर बिघडले असून त्याच्या दुरूस्तीला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. मंगळवारी यामधून मोठा आवाज होऊन बुश उडाले व आॅईलही बाहेर पडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वीज वितरण कंपनीला हजारो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. मंगळवारी दिवसभर वीज बंद होती. उडालेल्या बुशमध्ये डबल आॅईल भरून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू होते. चुकीची वीज बिले आलेल्यांना चार- चार महिने वीज बिल दुरूस्त करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अंबाजोगाईच्या कार्यालयात अनेक वेळा खेटे मारूनही प्रश्न मार्गी लागत नाहीत. त्यामुळे थकबाकीत वाढ होताना दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडीत झाला तर येथे कर्मचारी उपस्थित नसतो. खाजगी कंत्राटदार अनधिकृत कामे करत असल्याचा आरोप रामेश्वर नाईक यांनी केला. सहायक अभियंता आंबेकर म्हणाले, दुरुस्तीसाठी बजेट उपलब्ध नाही आम्ही काय करणार? असे सांगून हात झटकले. (वार्ताहर)