शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गुळ व्यापाऱ्यांची पावणेदोन लाखांची रोकड लंपास, लक्ष्मीपूरीतील घटना : दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:38 IST

लक्ष्मीपूरी येथे गुळ व्यापारी दूकान बंद करुन घरी जात असताना दूचाकीला अडकवलेली बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये १ लाख ८६ हजार ४५० रुपये होते. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. येथील एका खासगी रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दोघे चोरटे बॅग पळविताना दिसत आहेत.

ठळक मुद्देगुळ व्यापाऱ्यांची पावणेदोन लाखांची रोकड लंपासलक्ष्मीपूरीतील घटना, पोलीस घेत आहेत चोरट्यांचा शोध दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद

कोल्हापूर : लक्ष्मीपूरी येथे गुळ व्यापारी दूकान बंद करुन घरी जात असताना दूचाकीला अडकवलेली बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये १ लाख ८६ हजार ४५० रुपये होते. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. येथील एका खासगी रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दोघे चोरटे बॅग पळविताना दिसत आहेत.अधिक माहिती अशी, संदीप शिवगोंडा सदलगे (वय ३४, रा. डफळे कॉलनी, उचगाव, ता. करवीर) यांचा गुळाचा व्यवसाय आहे. लक्ष्मीपूरी येथे होलसेल गुळ विक्रीचे दूकान आहे. मंगळवारी दिवसभरात गुळ विक्रीतून जमा झालेली रक्कम १ लाख ८६ हजार ४५० रुपये तपकिरी रंगाचे पाकीटामध्ये ठेवून ते बॅगेत ठेवले होते.

रात्री नऊच्या सुमारास दूकान बंद करीत असताना त्यांनी पैशाची बॅग पत्नीकडे दिली. बाहेर पार्किंग केलेल्या दूचाकीच्या हॅन्डेलला बॅग अडकवून त्या तोंडाला स्कार्प बांधु लागल्या. तर सदलगे हे दूकानाचे शर्टर बंद करुन कुलपे घालुन मागे वळुन पाहतात तर बॅग गायब असल्याचे दिसले. त्यांनी पुन्हा दूकान उघडुन बॅग आतमध्ये विसरली आहे का पाहिले असता दिसून आली नाही.

दूकानाच्या वरती खासगी दवाखाना आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दूचाकीला अडकवलेली बॅग दोन चोरटे  चोरुन नेताना दिसले. हे दोघेही पाळत ठेवून होते. टेहाळणी करुन त्यांनी बॅग लांबवलेचे दिसून आले. याबाबत त्यांनी लक्ष्मीपूरी पोलीसांत फिर्याद दिली. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :crimeगुन्हेkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस