शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

कोल्हापुरात सी. आर. व्यास संगीत महोत्सव, देवकी पंडित यांच्या स्वरांनी चार चाँद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:03 IST

‘सरस सूर गाउ, मन रिझाउ.... देख चंदा नवीन कस आयो’ या देवकी पंडित यांनी गायिलेल्या बंदिशीने रविवारची शाहू स्मारक भवनातील सायंकाळ संगीत शौकिनांसाठी अविस्मरणीय आनंद देऊन गेली.

ठळक मुद्देगुणीदास फौंडेशन : सी. आर. व्यास संगीत महोत्सव देवकी पंडित यांच्या स्वरांनी रसिकांना डोलावले

कोल्हापूर : ‘सरस सूर गाउ, मन रिझाउ.... देख चंदा नवीन कस आयो’ या देवकी पंडित यांनी गायिलेल्या बंदिशीने रविवारची शाहू स्मारक भवनातील सायंकाळ संगीत शौकिनांसाठी अविस्मरणीय आनंद देऊन गेली.

पंडित यांच्या स्वरांना सहगायिका सुश्मीलता डवाळकर यांनी दिलेली साथ आणि सोबत ठेका धरायला लावणारा ओजस वालिया यांचा तबला, त्याला अश्विन वालावलकर यांचे छेडणारे हार्मोनियमवरील सूर यांनी गुणीदास फौंडेंशनद्वारे आयोजित मैफिलीला चार चाँद लावले.गुणीदास फौंडेशन, कोल्हापूर व महाराष्ट्र ललित कला निधी, मुंबई यांच्यातर्फे रविवारी कोल्हापुरात सी. आर. व्यास संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कोल्हापुरातील गायिका वासंती टेंबे यांनी शास्त्रीय गायिका देवकी पंडित, तबलाबादक ओजस वालिया, हार्र्मोनियमवादक अश्विन वालावलकर व सहगायिका सुश्मीलता डवाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सी. आर. व्यास यांनी रचलेल्या ‘सरस सूर गाउ, मन रिझाउ’ या बंदिशीने मैफलीला सुरुवात झाली. देवकी पंडित यांचा उत्तरोत्तर चढत जाणारा स्वर आणि त्याला तबला व हार्मोनियमची मिळणारी साथ यांमुळे मैफिलीत सुरुवातीपासून रंग भरू लागले.

राग धनकोलीतील ‘सरस सूर गाउ, मन रिझाउ’ या बंदिशीने पहिल्या पाच मिनिटांतच देवकी पंडित यांच्या स्वरांनी संगीत शौकिनांवर मोहिनी टाकण्यास सुरुवात केली. त्यांच्या जादूई स्वरांना संगीतशौकिनांनीही टाळ्यांची उत्स्फूर्त दाद दिली.

त्यानंतर ‘देख चंदा नवनी कस आयो’ या बंदिशीने देवकी पंडित आणि सुश्मीलता डवाळकर यांच्या स्वरातील जुगलबंदीने रसिकांची वाहवा मिळविली. शेवटी शेवटी तर तबला आणि सुरांच्या अत्युच्च जुगलबंदीने रसिक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले.

 

 

टॅग्स :musicसंगीतkolhapurकोल्हापूर