शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाखाधिकारी, कॅशिअर निलंबीत, जिल्हा बॅँकेची कारवाई : पोलीसांच्या पातळीवर कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 17:50 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावट सोने प्रकरणातील संशयित शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (शिये, ता. करवीर) व कॅशिअर परशराम कल्लाप्पा नाईक (साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) यांना बॅँकेने निलंबीत केले. पोलीसांच्या पातळीवर आता कसून चौकशी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशाखाधिकारी, कॅशिअर निलंबीतजिल्हा बॅँकेची कारवाई : पोलीसांच्या पातळीवर कसून चौकशी

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावट सोने प्रकरणातील संशयित शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (शिये, ता. करवीर) व कॅशिअर परशराम कल्लाप्पा नाईक (साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) यांना बॅँकेने निलंबीत केले. पोलीसांच्या पातळीवर आता कसून चौकशी सुरू झाली आहे.कसबा बावडा शाखेत २७ सोने तारण कर्ज प्रकरण बनावट सोने ठेवून सुमारे ३२ लाखाचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. बॅँकेचे तपासणी अधिकारी रामगोंडा पाटील यांनी चौकशी अंती मंगळवारी शाखाधिकारी संभाजी पाटील, कॅशिअर परशराम नाईक व सोनार सन्मुख ढेरे यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. बॅँकेनेही शाखाधिकारी पाटील व कॅशिअर नाईक यांना निलंबीत केले आहे. शाहूपूरी पोलीसांनी तिघांची कसून चौकशी सुरू केली आहे.दरम्यान, बॅँकेने संबधितांवर पोलीसात गुन्हा दाखल केला असला तरी ज्यांच्या हातात बनावट सोने पडले ते कोंडीत सापडले आहेत. पोलीस चौकशीतून सोने परत मिळाले तर ठीक अन्यथा बॅँक पैसे देईल त्यावेळी सोने मिळणार असल्याने ग्राहकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

नाईकवर वरदहस्त कोणाचा?बॅँकेवर प्रशासक असताना तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कामावर ठेवले जात नव्हते. तरीही कॅशिअर परशराम नाईक तब्बल आठ वर्षे कसबा बावडा शाखेत कसा राहिला. त्यामागे नेमका कोणाचा वरदहास्त आहे, याचीही चर्चा आता बॅँकेत सुरू झाली आहे.बॅँक प्रशासन खडबडून जागेकसबा बावडा शाखेतील अपहाराने बॅँकेचे प्रशासन चांगलेच खडबडून जागे झाले आहे. मुख् य कार्यालयासह सर्वच १९१ शाखांची महिन्याला तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी चार्टड आकौंटट (सीए) नेमले जाणार आहेत. त्यासाठी अर्ज मागवले असून २२ जून पर्यंत अर्ज करावयाचे आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक असे बारा ‘सीए’चे नेमणूक होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर