शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हद्दवाढीची चर्चा नुसतीच, हालचाल नाही कसलीच; मुख्यमंत्र्यांकडून तोंडी, लेखी सूचना नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:09 IST

नवीन प्रस्ताव करण्यात अडचण

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशा सूचना देऊन दोन दिवस उलटले तरी प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणतीच हालचाल सुरू झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली सूचना तोंडी अथवा लेखी स्वरूपात आमच्याकडे अजूनही आली नसल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दोन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शहराची हद्दवाढ करणे का आवश्यक आहे, हे पटवून दिले होते. त्यानंतर ही प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशी सूचना त्यांनी दिली होती. आमदार क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना पत्र द्यायचे आणि त्याच्या आधारावर नगररचना विभागाने आठ गावांचा प्रस्ताव द्यायचा असे मंगळवारच्या बैठकीत ठरले होते.आमदार क्षीरसागर यांनी अजून पत्र दिलेले नाही. त्यामुळे प्रशासनातील अधिकारीही काहीच लेखी आले नसल्याने प्रस्तावाची तयारी केलेली नाही. जर सरकारला हद्दवाढ करायची असेल तर पूर्वीच्या प्रस्तावाद्वारे करू शकतात, पूर्वीच्या प्रस्तावानुसार आठ गावांचा समावेश करून अध्यादेश काढू शकतात. नवीन प्रस्ताव पाठवायचीही गरज नाही, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.नवीन प्रस्ताव करण्यात अडचणशहराची हद्दवाढ करणे ही बाब धोरणात्मक आहे आणि धोरण ठरविण्याचा अधिकार लोकनियुक्त सभागृहाला आहे. हद्दवाढीची मागणी करण्याचा ठराव आधी सभागृहात मंजूर करावा लागतो. त्यानंतर प्रशासन तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविते. सध्या लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे ठराव कोणी मंजूर करायचा हा प्रश्न आहे. २०२२ मध्ये अठरा गावे, दोन एमआयडीसींचा जो प्रस्ताव पाठविला त्यावेळी अशीच अडचणी आली होती. तेंव्हा २०१७ मध्ये सभागृहात मंजूर केलेल्या ठरावानुसार पाठविला होता. आताही तीच अडचण येणार आहे.