शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

शेतजमीन नसलेली गावे हद्दवाढीत घ्या - उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:36 IST

ज्या गावात मोठ्या प्रमाणात शेती आहे, अशी गावे बाजूला ठेवून गुंठेवारी, शेतजमीन नसलेली गावे हद्दवाढीत घ्या. हद्दवाढीच्या प्रस्ताव मंजुरीसाठी मी मदतो करतो, असा शब्द त्यांनी दिला.

कोल्हापूर : तीन महिन्यांचा महापौर, सहा महिन्यांचा स्थायी समितीचा सभापती केल्यावर मग तुमच्या शहराची हद्दवाढ कशी होणार, अशी रोखठोक विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केली. ज्या गावात मोठ्या प्रमाणात शेती आहे, अशी गावे बाजूला ठेवून गुंठेवारी, शेतजमीन नसलेली गावे हद्दवाढीत घ्या. हद्दवाढीच्या प्रस्ताव मंजुरीसाठी मी मदतो करतो, असा शब्द त्यांनी दिला.

क्रिडाई कोल्हापूरतर्फे आयोजित बांधकामविषयक दालन-२०२२ या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. शाहूपुरी जिमखाना मैदानावरील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, तर खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले, तीन महिन्याला महापौर, सहा महिन्याला स्थायी सभापती मी बदलले नाहीत. त्यामुळे हद्दवाढ होऊन पिंपरी-चिंचवडचा चेहरा-मोहरा बदलला. हद्दवाढीबाबत सर्व आमदार, खासदारांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. सध्या महापालिका, जिल्हा परिषदेत प्रशासक आहेत. त्यापूर्वी स्टँडिंग-अंडरस्टँडिंगमुळे जे निर्णय थांबले होते. त्यांना गती द्या. कोल्हापूरच्या विकासाला महाविकास आघाडी सरकारचे बळ आहे. रस्ते, ड्रेनेज व्यवस्थेसाठी मोठा निधी दिला आहे. पुण्यानंतर विकसित, आश्वासक शहर म्हणून कोल्हापूरला पुढे नेवूया, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.बांधकाम कामगारांची सर्व जबाबदारी शासनाने कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून उचलली आहे. त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. यामुळे बांधकाम व्यावसायिक, विकासकांचा मोठा भार हलका झाला असल्याचे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. या कार्यक्रमास आनंद माने, व्ही. बी. पाटील, संजय शेटे, जितेंद्र गांधी, रमेश मिश्रा, गुरूप्रीत सिंग, आदी उपस्थित होते. क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी हद्दवाढ. भोगवटा प्रमाणपत्र, खंडपीठ, पायाभूत सुविधांबाबतच्या मागण्या मांडल्या. दालनचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. सचिव प्रदीप भारमल यांनी आभार मानले.

विमानतळ विकासाला निधी देणार

कोल्हापूर विमानतळाला महत्त्व देऊन त्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जर, सुविधा पाहिजे असतील, तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे पवार यांनी सांगितले. रेडिरेकनर स्थिर दर, मुद्रांक शुल्कात सवलत, आदी निर्णयांद्वारे बांधकाम क्षेत्राला बळ दिले. क्रिडाई कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी माझी वेळ घेऊन मंत्रालयात यावे. क्रशर बंदी, भोगवटा प्रमाणपत्र, आदी प्रलंबित प्रश्न सोडविले जातील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार