शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

चर्चा करुन कोल्हापूरची हद्दवाढ अशक्यच, राजकीय इच्छाशक्ती हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:03 IST

राजेश क्षीरसागर आग्रही : अमल महाडिक, चंद्रदीप नरके यांचा अपेक्षेनुसारच विरोध कायम

कोल्हापूर : गेली पाच दशके या ना त्या कारणाने रखडलेली कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने नव्याने रेटा लावला आहे. या समितीच्या बुधवारी शिवाजी पेठेत झालेल्या बैठकीत कोल्हापूर दक्षिण व करवीरच्या आमदारांनी हद्दवाढीसंबंधी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी झाली. म्हणून ‘लोकमत’ने गुरुवारी हद्दवाढीशी संबंधित तिन्ही आमदारांकडे हद्दवाढीसंबंधी त्यांची भूमिका जाणून घेतली. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर हे अपेक्षेप्रमाणे हद्दवाढीसाठी आग्रही असल्याचे, तर कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक व करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचा मात्र विरोध असल्याचे स्पष्ट झाले. मूळ शहराचा विकास करा मगच हद्दवाढ करा, अशी त्यांची भूमिका आहे. पक्ष कोणताही असला तरी दक्षिण व करवीरच्या आमदारांची भूमिका कायम अशीच राहिली आहे. हद्दवाढीचे समर्थन करणे त्यांना राजकीयदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे त्यांची हीच भूमिका कायम असेल. ती गृहीत धरूनच राजकीय इच्छाशक्ती वापरली तरच हद्दवाढ होऊ शकते, अन्यथा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे प्रश्नाचे गुऱ्हाळ कायमच सुरू राहील.विरोधासाठी विरोध नकोहद्दवाढीला याचा विरोध आणि त्याचा विरोध, असे होता कामा नये. पुण्यासारख्या शहरांनी सातत्याने हद्दवाढ केल्यामुळे आज या शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. कोल्हापूर शहरावर मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणूनच ग्रामीण भागाला उत्तम सुविधा देऊन त्यांना शहरात सामावून घेण्याची गरज आहे, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.फडणवीस, शिंदे यांच्याकडे निधीची मागणीएकीकडे शहरातील प्रश्न संपवत असताना दुसरीकडे प्राधिकरणाला मोठा निधी देऊन त्या माध्यमातून गावातील सोयीसुविधा उत्तम करणे आणि त्यांना शहरातील सुविधांच्या बरोबरीने आणणे महत्त्वाचे आहे. प्राधिकरणाला निधी देऊन त्या माध्यमातून गावागावांत विकासकामे झाली पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. - आमदार अमल महाडिकलोकसंख्येची अट रद्द, मग अट्टाहास का?काही मंडळी शहराची लोकसंख्या कमी असल्याने विकासनिधी मिळत नसल्याचे सांगत आहेत. पण, केंद्र सरकारने ही अट यापूर्वीच रद्द केली आहे, मग हद्दवाढीसाठी अट्टाहास का? अशी विचारणा आमदार नरके यांनी केली. करवीरमधील ४२ गावांसाठी प्राधिकरण तयार केले, त्या माध्यमातून शहराशेजारील गावांचा विकास करण्याचे नियोजन आहे. पण, त्यातून किती विकास झाला? अशी विचारणाही आमदार चंद्रदीप नरके यांनी केली.

हद्दवाढीला २० गावांचा विरोधच !उचगाव : वीस गावांना विश्वासात न घेता हद्दवाढीचा निर्णय घेतल्यास या गावांतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. यापुढेही हद्दवाढीला तीव्र विरोधच राहील, असे उजळाईवाडी ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत हद्दवाढ विरोधी कृती समितीचे कार्याध्यक्ष सरपंच उत्तम आंबवडे व समितीचे अध्यक्ष उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी स्पष्ट केले.यावेळी उत्तम आंबवडे म्हणाले की, पालकमंत्री यांना भेटून हद्दवाढ का नको, तसेच शहराचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास महानगरपालिकेला येत असलेले अपयश, हद्दवाढीचा घाट घालून ग्रामस्थांचे हाेणारे नुकसान हे निर्दशनास आणून देऊ. याबरोबर कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनाही भेटून हद्दवाढ कृती समिती आपली भूमिका मांडणार आहे.बैठकीसाठी सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ, पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, सुमन गुरव, गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील, रूपाली पाटील, उपाध्यक्ष नारायण गाडगीळ, तंटामुक्ती अध्यक्ष नायकू बागणे, किरण अडसूळ, राहुल पाटील, चंद्रकांत डावरे, ए. व्ही. कांबळे, संदीप पाटोळे, रूपाली कुसळे, अमर मोरे, रसिका पाटील यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामविकासात ग्रामपंचायतीला १५ वित्त आयोगातून निधी उपलब्ध होत आहे. अन्य निधीतून गावचे मूलभूत प्रश्न सोडविले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत उचगाव हद्दवाढीत जाणार नाही, कायम विरोधच राहील.- मधुकर चव्हाण, सरपंच, उचगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरAmal Mahadikअमल महाडिक