शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव!
2
टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
3
"तुम्ही मुख्यमंत्री असताना झोपला होतात का?" 'त्या' मागणीवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"तिच्या अंगाची दुर्गंधी येते"; प्रतिस्पर्ध्याला वापरण्यास सांगितले डीओ; टेनिसमधला अजब प्रकार
5
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी
6
हो, मलाही शिंदेंच्या शिवसेनेत सहभागासाठी ऑफर; खासदार राजाभाऊ वाजे यांचा गौप्यस्फोट
7
३ दिवस खोलीत सडत राहिली काजोलच्या आजीची डेडबॉडी, ८४व्या वर्षी झाला दुर्देवी अंत
8
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात, Nifty ६० अंकांनी घसरला; IT Stocks आपटले
9
"बंगाली हिंदू बेघर, छावण्यांमध्ये खिचडी खातायत...!"; प. बंगालमधील हिंसाचारावरून मिथुन यांचा ममतांवर प्रहार, म्हणाले...
10
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णीचाही होणार सन्मान
11
IPL 2025: "पराभवास मीच जबाबदार, मी चुकीचा शॉट खेळलो"; अजिंक्य रहाणे पराभवानंतर निराश
12
४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई
13
"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला
14
ठाणे : बाल आश्रमात २ मुलींवर अत्याचार, २९ पीडित मुलांची केली सुटका; संचालकासह पाच जणांवर गुन्हा
15
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
16
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
17
विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’
18
एसटीच्या सवलतींचा महाराष्ट्रातील १८१ कोटी प्रवाशांना लाभ, ६,४९५ कोटींची सवलत; महामंडळाची माहिती
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
20
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू

कोल्हापूर भाजप महानगर जिल्हाध्यपदी विजय जाधव

By समीर देशपांडे | Updated: July 19, 2023 12:55 IST

कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहूल देसाई आणि हातकणंगले लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांची नियुक्ती

कोल्हापूर : गेले काही महिने रखडलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची तर कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहूल देसाई आणि हातकणंगले लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या पाहता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच शिफारस केलेल्या नावांना संधी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. विजय जाधव हे सध्या भाजप जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. ते १९८६ पासून भाजपचे काम करत आहेत. युवा मोर्चा आणि भाजपमध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या जाधव यांनी मंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले होते. राहूल देसाई हे काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव असून त्यांनी २०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. राजवर्धन निंबाळकर हे सध्या शिरोळचे भाजपचे तालुकाध्यक्ष असून त्यांचे वडील राष्ट्रवादीसोबत होते. ते जिल्हा बँकेचे अध्यक्षही होते. २०१७ साली निंबाळकर जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपा