शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कोल्हापूर : ‘भोगावती’,‘ हनुमान’ सहकार भूषण, पुरस्कार पटकाविणाऱ्या पहिल्या दूध संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 16:31 IST

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा सहकार भूषण पुरस्कार सडोली खालसा (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी दूध संस्था व घोटवडे (ता. राधानगरी) येथील हनुमान दूध संस्थेला जाहीर झाला आहे. ‘सहकार भूषण’ पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या दूध संस्था आहेत. शनिवारी पुण्यात शानदार कार्यक्रमात वितरण होणार आहे.

ठळक मुद्दे‘भोगावती’,‘ हनुमान’ सहकार भूषणपुरस्कार पटकाविणाऱ्या पहिल्या दूध संस्था शनिवारी पुण्यात वितरण

कोल्हापूर : राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा सहकार भूषण पुरस्कार सडोली खालसा (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी दूध संस्था व घोटवडे (ता. राधानगरी) येथील हनुमान दूध संस्थेला जाहीर झाला आहे. ‘सहकार भूषण’ पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या दूध संस्था आहेत. शनिवारी पुण्यात शानदार कार्यक्रमात वितरण होणार आहे.सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वेगवेगळ्या गटातील संस्थांकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले जातात. राज्यस्तरीय ‘सहकार महर्षि’, ‘सहकार भूषण’ अशा पुरस्काराने संस्थांना गौरवण्यात येते. यंदा ‘सहकार महर्षी’ साठी जिल्ह्यातून ‘गोकुळ’चा प्रस्ताव आहे.

सहकार भूषणसाठी जिल्ह्यातून बारा दूध संस्थांचे प्रस्ताव आले होते. जिल्हास्तरीय समितीने छाननी करून सहा संस्था विभागीय स्तरावर पाठविल्या. तेथून चार संस्था राज्यस्तरावर पाठवल्या. त्यातून ‘हनुमान’, घोटवडे व ‘भोगावती’ सडोली खालसा यांना ‘सहकार भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.पुणे येथे होणाऱ्या कृषी महोत्सव व सहकार परिषदेत या संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार वितरण होणार आहे.

दृष्टीक्षेपात पुरस्कार प्राप्त संस्था-

भोगावती, सडोली खालसा :

स्थापना - १ जूलै १९६७सभासद- ३८५वार्षिक संकलन : म्हैस-२ लाख ६१ हजार ३३६, गाय - १ लाख ५० हजार ७०१ लिटरउत्पादने- बर्फी, पेढे, लस्सी, खवा.उलाढाल - ६ कोटी ४० लाखनफा - २१ लाख ५० हजारआॅडीट वर्ग - ४६ वर्षे सतत ‘अ’सामाजिक काम - वृक्ष लागवड, रक्तदान शिबीरे, गरीब व अपंग विद्यार्थ्यांन शैक्षणिक साहित्य वाटप, आपत्तीवेळी सभासदांना मदत.संस्थापक - माजी आमदार पी. एन. पाटील, मार्गदर्शन - निवासराव पाटील, संभाजीराव पाटील, उदय पाटील. अध्यक्ष - महादेव मगदूम.

हनुमान, घोटवडेस्थापना- २४ आॅगस्ट १९७२सभासद-५९६वार्षिक संकलन - २ लाख ६ हजार ३३८ लिटर.उलाढाल - २ कोटी ५७ लाख ६९ हजारनफा -४ लाख ८८ हजारआॅडीट वर्ग - सलग ३४ वर्षे ‘अ’सामाजिक काम - गावात स्वच्छता गृहे, जनावरांची पाण्याची सोय, शतकोटी वृक्ष लागवड, सभासदांना मदत, संघाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीअध्यक्ष- अरूण डोंगळे, मार्गदर्शन - विजयसिंह डोंगळे, धीरज डोंगळे, सचिव -केरबा पाटील. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरState Governmentराज्य सरकार