शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भुयेवाडीत लिंबाचे झाड तोडल्यावरून भाऊबंदकीत मारामारी, आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 17:56 IST

शेतातील सामायिक लिंबाचे झाड तोडल्याच्या कारणावरून भुयेवाडी (ता. करवीर) येथे भाऊबंदकीत काठी, कुऱ्हाड  व काठी, लोखंडी पाईप यांनी झालेल्या मारामारीत आठजण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, याप्रकरणी एकूण आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २) रात्री घडली.

ठळक मुद्देभुयेवाडीत लिंबाचे झाड तोडल्यावरून भाऊबंदकीत मारामारीआठ जखमी, परस्परविरोधी तक्रारी : चौघांना अटक

कोल्हापूर : शेतातील सामायिक लिंबाचे झाड तोडल्याच्या कारणावरून भुयेवाडी (ता. करवीर) येथे भाऊबंदकीत काठी, कुऱ्हाड  व काठी, लोखंडी पाईप यांनी झालेल्या मारामारीत आठजण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, याप्रकरणी एकूण आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २) रात्री घडली.या प्रकरणी संशयित विश्वास पांडुरंग पाटील, सागर आनंदा पाटील, अरुण विश्वास पाटील व मालूबाई विश्वास पाटील (चौघे रा. भुयेवाडी) यांच्याविरोधात उदय महादेव पाटील यांनी फिर्याद दिली; तर महादेव पांडुरंग पाटील, उदय महादेव पाटील, अंकुश महादेव पाटील व शालाबाई महादेव पाटील (चौघे रा. भुयेवाडी) या संशयितांविरोधात अरुण पाटील यांनी फिर्याद दिली.

या मारहाणीत महादेव पाटील, शालाबाई पाटील,उदय व अंकुश पाटील; तर अरुण, विश्वास, संगीता अरुण पाटील व सागर पाटील हे आठजण जखमी झाले. या सर्वांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांतील चौघांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.याबाबत पोलिसांनी सांगितले की, भुयेवाडीत शुक्रवारी दुपारी शेतातील लिंबाचे झाड तोडल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून संशयित सागर पाटील, अरुण पाटील व मालुबाई पाटील यांनी उदय पाटील याच्या भावास घरात घुसून काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उदयचे वडील महादेव पाटील व आई शालाबाई यांना संशयित विश्वासने कुऱ्हाडीने डोक्यात वार करून जखमी केले. यात हे चौघे जखमी झाले.यानंतर महादेव पाटील, त्यांचा मुलगा उदय, अंकुश व शालाबाई पाटील यांनी सामायिक लिंबाच्या झाडाच्या हद्दमालकीच्या कारणावरून व झाड तोडण्याच्या कारणावरून अरुण पाटील व विश्वास, संगीता व सागर या चौघांना शिवीगाळ करून डोळ्यांत चटणी टाकली. त्यांना काठ्या व लोखंडी पाईपने मारहाण केली. यात हे चौघे जखमी झाले. या सर्वांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप तिबिले करीत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा