शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये ‘कोल्हापूर’ची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 7:52 PM

कोल्हापूूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींमध्ये कोल्हापूर विभाग (छत्रपती शाहू विद्यालय) संघाने पुणे विभागाचा ४-३ असा टायब्रेकरवर; तर १९ वर्षांखालील मुलांमध्ये मुंबई विभागाने यजमान कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल) संघाचा २-१ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.

ठळक मुद्देराज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये ‘कोल्हापूर’ची बाजी१९ वर्षांखालील मुलांत मुंबई विभागाचा वरचष्माकोल्हापूरला उपविजेतेपदावर समाधान

कोल्हापूूर : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींमध्ये कोल्हापूर विभाग (छत्रपती शाहू विद्यालय) संघाने पुणे विभागाचा ४-३ असा टायब्रेकरवर; तर १९ वर्षांखालील मुलांमध्ये मुंबई विभागाने यजमान कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल) संघाचा २-१ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.गेले दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी दुसऱ्या दिवशी शाहू स्टेडियम येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत कोल्हापूर विभागाने नागपूर विभागाचा ३-० असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. यात कोल्हापूरकडून प्रणव घाडगे, दिग्विजय आसनेकर, कुणाल चव्हाण यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली. दुसºया उपांत्य सामन्यात मुंबई विभागाने क्रीडा प्रबोधिनीचा २-१ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. यात मुंबईकडून श्रेयस व्हटकरने दोन, तर क्रीडा प्रबोधिनीतर्फे शंतनू लिंबूनरकर याने एकमेव गोल केला.

फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये ‘कोल्हापूर’ची बाजी" title="राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये ‘कोल्हापूर’ची बाजी"/>
राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये ‘कोल्हापूर’ची बाजी
कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत एकोणीस वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद पटकाविलेल्या मुंबई संघास शाहू छत्रपती व आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी युवा नेमबाज शाहू माने, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, माणिक मंडलिक, नगरसेवक संभाजी जाधव, शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)दुपारच्या सत्रात झालेल्या अंतिम सामन्यात यजमान कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल) संघाला मुंबई विभाग संघाकडून २-१ असे पराभूत व्हावे लागले. मुंबईकडून रिद्धेश बकले, जुबेर मातवली यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली; तर कोल्हापूरकडून प्रणव कणसे याने एकमेव गोल केला.मुलींमध्ये १७ वर्षांखालील गटात कोल्हापूर विभागाने नागपूर विभागाचा ४-० असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. यात कोल्हापूरकडून अंजुदेवी हिने दोन, तर सना थोयबी, प्रणाली चव्हाण यांनी प्रत्येकी एक गोल करीत अंतिम फेरीत प्रवेश करण्यास साहाय्य केले. दुसºया उपांत्य सामन्यांत पुणे विभागाने औरंगाबाद विभागाचा ४-० असा पराभव केला. यात पुणेकडून स्नेहल कळमळकर हिने दोन, तर प्रतीक्षा कापरे, कीर्ती गोसावी यांनी प्रत्येकी एक गोल करीत आपल्या संघास अंतिम फेरीत पोहोचविण्यास मदत केली.

अंतिम सामन्यात कोल्हापूर व पुणे विभाग यांच्यात संपूर्ण वेळेत १-१ अशी बरोबरी झाली. यात कोल्हापूरकडून निहारिक पाटील हिने, तर पुणेकडून सृष्टी बडे हिने एक गोलची नोंद केली. टायब्रेकरवर निकाल झालेल्या या अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागाने पुणे विभागाचा ४-३ असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. कोल्हापूरच्या विजयी संघात साक्षी जाधव, अनुष्का खतकर, रिया बोलके, रम्याश्री शांतिप्रसाद, संजना लगारे, भक्ती बिरनगडी, सनादबी, थुबी, प्रणाली चव्हाण, निहारिक पाटील, अंजुदेवी, देविका सरनोबत, अंशू याद, आदींचा समावेश होता.स्पर्धेचा बक्षीस समारंभ शाहू छत्रपती, आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, माणिक मंडलिक, शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर