शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

कोल्हापूर : गुलालाच्या उधळणीला भेसळीची लागण, प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 20:00 IST

‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्री यात्रेत गुलाल अन् खोबऱ्याच्या उधळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा फायदा घेत काही व्यापारी निकृष्ट दर्जाचा गुलाल विकतात. त्यामुळे भाविकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ही भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देगुलालाच्या उधळणीला भेसळीची लागणप्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा

कोल्हापूर : ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्री यात्रेत गुलाल अन् खोबऱ्याच्या उधळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा फायदा घेत काही व्यापारी निकृष्ट दर्जाचा गुलाल विकतात. त्यामुळे भाविकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ही भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे.पंढरपूरच्या विठूरायाचा बुक्का, सौंदत्तीच्या रेणुकामातेचा भंडारा व ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाचा गुलाल कपाळी लावल्यानंतर भाविकाला जे आत्मिक समाधान लाभते. त्याची जोड अन्य कशालाही लागू होत नाही. मात्र, त्याचा फायदा घेत अनेक जण निकृष्ट दर्जाचा माल यात्राकाळात विकतात.

‘चांगभलं रे चांगभलं...ऽऽ देवा जोतिबा चांगभलंऽऽ’, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽचा गजर...’,गुलाल-खोबऱ्याची उधळण ही यात्रेची पारंपरिक पद्धत आहे. गुलालाशिवाय ही यात्रा संपन्न होत नाही. जोतिबा यात्रेचे प्रतीक असणाऱ्या गुलालास या काळात मोठी मागणी असते. त्यामुळे काही व्यापारी निकृष्ट दर्जाचा गुलाल विक्री करतात.

त्यामुळे अनेकदा यात्रेकरूंच्या अंगावर हा गुलाल उधळल्यानंतर त्यांच्या अंगाला खाज उठणे, पुरळ उठणे, प्रसंगी रासायनिक प्रक्रिया होऊन चेहरा सुजणे, नाकावाटे रासायनिक गुलाल गेल्याने श्वासोश्वास करण्यास त्रास होणे, अशा अनेक आरोग्याच्या प्रकारांना भाविकांना सामोरे जावे लागते. याची शक्यता गृहीत धरून अन्न व औषध प्रशासनाने निकृष्ट दर्जाचा गुलाल विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारावा. यासह गुलालाची मर्यादित स्वरूपात उधळण व्हावी. याकरिताही प्रबोधन होण्याची आवश्यकता भाविकांकडून व्यक्त होत आहे.

 

निकृष्ट व रासायनिक गुलालाची उधळण केल्यानंतर काही भाविकांना तत्काळ त्रास होतो तर काहींना एक किंवा दोन दिवसांनी त्याचा त्रास होतो. त्यात प्रथम पुरळ उठणे, अंगाला खाज उठणे, चेहरा सुजणे, उधळण केलेल्या गुलाल नाकावाटे शरीरात गेल्यास रिअ‍ॅक्शन येणे, प्रसंगी श्वासोश्वास घेण्यास त्रास होणे, आदी आरोग्याच्या समस्या उद्भवतात. याकरिता चांगल्या दर्जाचाच गुलाल भाविकांनी वापरावा. शक्यतो कमी गुलालाची उधळण करणे ही बाब सुद्धा गरजेची बनली आहे.-डॉ. गणेश ढवळशंख, त्वचारोग तज्ज्ञ

 

स्थानिक व्यापारी चांगल्या दर्जाचाच सरपंच, समाधान, स्टार ब्रँडचाच गुलाल विक्री करतात. आरोग्याला घातक गुलालाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने या काळात करावी. निकृष्ट दर्जाच्या गुलालाची विक्री बंद होईल व भाविकांना यात्रेचा आनंद द्विगुणित करता येईल.- सुशांत कोकाटे, पूजा साहित्य विक्रेते, वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर)

 

टॅग्स :Jyotiba Chaitra Yatra 2018ज्योतिबा चैत्र यात्रा २०१८kolhapurकोल्हापूर