कोल्हापूरची पुण्यावर दणदणीत मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST2021-03-04T04:45:44+5:302021-03-04T04:45:44+5:30

कोल्हापूर : राज्य क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित १९ वर्षांखालील निमंत्रित आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने पुणे जिल्हा क्रिकेट ...

Kolhapur beat Pune by a landslide | कोल्हापूरची पुण्यावर दणदणीत मात

कोल्हापूरची पुण्यावर दणदणीत मात

कोल्हापूर : राज्य क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित १९ वर्षांखालील निमंत्रित आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा २४१ धावांनी दणदणीत पराभव केला. कोल्हापूरकडून हर्षवर्धन जाधवने १३१, तर स्मित संजय पाटील व तुषार पाटील यांनी प्रत्येकी ४५ धावांची खेळी केली.

राजाराम काॅलेज मैदानावर झालेल्या या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर संघाने ५० षटकांत ९ बाद ३३८ धावांचा डोंगर केला. यात हर्षवर्धन जाधवने १३१, श्रेयस चव्हाणने ५३, स्मित पाटील, तुषार पाटील यांनी प्रत्येकी ४५ व अभिजित लोखंडे याने १७ धावा केल्या. गोलंदाजी करताना पुणे संघाकडून विक्रांत दापकेने ४, साईरीश देसाई व अनुराग प्रभूणे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना पुणे संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ २८ षटकांत १०१ धावांत बाद झाला. सिद्धांत घाटवेने ३७ व वरुण मवाल याने १६ धावा केल्या. कोल्हापूर संघाकडून श्रेअस चव्हाणने तीन, तुषार पाटील व अभिषेक निषाद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अभिजित लोखंडे व श्रीराज चव्हाण यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कोल्हापूरच्या भेदक गोलंदाजीपुढे पुणे संघाने सपशेल नांगी टाकली. त्यामुळे पुणे संघाचा २४१ धावांनी दारुण पराभव झाला.

फोटो : ०३०३२०२१-कोल-हर्षवर्धन जाधव-क्रिकेट

०३०३२०२१-कोल-स्मित पाटील व तुषार पाटील-क्रिकेट

Web Title: Kolhapur beat Pune by a landslide