शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर :भाजप सरकारविरोधात रस्त्यावरील संघर्षासाठी तयार रहा : मेघा पानसरे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:02 IST

एकीकाळे कामगार संघटना देशाचे राजकारण ठरवत होती, पण जागतिकीकरणामुळे कामगार चळवळीला धक्का बसला आहे. कोणतेही सरकार आले तरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर यावेच लागते, भाजप सरकारच्या कालावधीत कामगार वर्गासह सर्वच क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षासाठी तयार रहा. असे आवाहन ‘आयटक’च्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.

ठळक मुद्देभाजप सरकारविरोधात रस्त्यावरील संघर्षासाठी तयार रहा : मेघा पानसरे यांचे आवाहन ‘आयटक’चे त्रैवार्षिक अधिवेशन : पानसरे हत्यारे न सापडण्यामागील गौडबंगाल काय?

कोल्हापूर : एकीकाळे कामगार संघटना देशाचे राजकारण ठरवत होती, पण जागतिकीकरणामुळे कामगार चळवळीला धक्का बसला आहे. कोणतेही सरकार आले तरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर यावेच लागते, भाजप सरकारच्या कालावधीत कामगार वर्गासह सर्वच क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षासाठी तयार रहा. असे आवाहन ‘आयटक’च्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.आॅल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेस (आयटक)शी संलग्न जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा बुधवारी शाहू स्मारक भवनात झाला. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. डॉ. पानसरे म्हणाल्या, स्वर्गीय गोविंद पानसरे यांनी उभी हयात कामगार चळवळीत घालविली. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानी शिकवणीच्या बळावर चळवळ पुढे चालू आहे. कोणतेही सरकार कष्टकऱ्यांना स्वइच्छेने देत नाही, त्यासाठी संघर्ष अटळ असतो. ‘आयटक’ ही जागतिक पातळीवरील मोठी संघटना असून त्यामाध्यमातून लाखो कष्टकऱ्यांना न्याय देता आला.

कष्ट, प्रामाणिकपणा व नैतिकता ही चळवळीची ताकद असून त्या भांडवलावरच सरकारला जाब विचारू शकतो. पण चळवळीचे विचार मान्य नसणाऱ्यांनी गोविंद पानसरे, दाभोलकर आदींची हत्या केली. साडे तीन वर्षे झाले तरी त्यांचा मास्टरमार्इंड सापडत नाही, हे दुर्देवी असून कर्नाटक पोलीसांनी गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्या हत्येचा छडा लागला पण महाराष्ट्र पोलीस अजूनही चाचपडतच तपास करत आहे, यामागील गौडबंगाल काय? असा सवालही डॉ. पानसरे यांनी केला.‘आयटक’चे जनरल सेक्रेटरी दिलीप पवार म्हणाले, चळवळीच्या ताकदीवर असंघटीत कामगारांची महामंडळे झाली पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अनेकांच्या बलिदानातून कायदे निर्माण झाले, ते बदलण्याचे षडयंत्र सरकारचे सुरू असल्याने संघर्षासाठी तयार रहावे. एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. बळवंत पोवार, उमेश पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले. जमीर शेख यांनी आभार मानले. विक्रम कदम, सशिला यादव, सदाशिव निकम आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर