शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बाजार समितीत कांद्याला विक्रमी दर, ११ हजार रुपये क्विंटल कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 11:45 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याने उच्चांक गाठला. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ११ हजार रुपये कांद्याला दर मिळाला असून, गेल्या वर्षभरातील हा विक्रमी दर आहे. पाच हजार पिशव्यांची आवक झाली असून, सरासरी दर प्रतिक्विंटल ४५०० रुपये राहिला.

ठळक मुद्देकोल्हापूर बाजार समितीत कांद्याला विक्रमी दर, ११ हजार रुपये क्विंटल कांदासरासरी ४५०० रुपये : पाच हजार पिशव्यांची आवक

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याने उच्चांक गाठला. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ११ हजार रुपये कांद्याला दर मिळाला असून, गेल्या वर्षभरातील हा विक्रमी दर आहे. पाच हजार पिशव्यांची आवक झाली असून, सरासरी दर प्रतिक्विंटल ४५०० रुपये राहिला.बाजार समितीत सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक किलोही कांदा समितीत येत नाही. राज्यातील इतर समित्यांपेक्षा कोल्हापूर बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची नेहमीच या समितीला पसंती राहिली आहे. २00 ते २५0 किलोमीटर अंतर कापून शेतकरी येथे माल घेऊन येतात. यंदा अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले. त्याचा परिणाम आवकेवर झाल्याचा दिसतो.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात समितीत एक लाख १७ हजार ७०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यंदा मात्र या महिन्यात ७३ हजार ८५५ क्विंटलच आवक झाली आहे. दरात मात्र मोठी तफावत दिसत असून, गेल्या वर्षी प्रतिक्विंटल सरासरी ७०० रुपये दर होता, तोच यंदा चार हजारांपर्यंत पोहोचला आहे. बुधवारी समितीत ५००५ कांदा पिशव्यांची आवक झाली. सौद्यात प्रतिक्विंटल दोन हजार ते ११ हजार रुपयांपर्यंत दर पोहोचला. मंगळवारी हाच दर दोन हजार ते १० हजारांपर्यंत राहिला.मागे रडवले आता हसवलेमागील दोन वर्षे कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली होती. एक रुपये किलोने कांदा विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोकळे गोणपाट घेऊनच घरी जावे लागत होते. गेले महिनाभर मात्र नेहमी रडवणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर थोडे हसू आणल्याचे दिसते.

डिसेंबरअखेर दर तेजीत राहणारकेंद्र सरकारने कांद्याची आयात केली तरीही दरात फारशी घसरण होईल, असे व्यापाऱ्यांना वाटत नाही. मुळात कांद्याचे उत्पादनच घटल्याने किमान डिसेंबरपर्यंत दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे.नोव्हेंबरमधील समितीतील कांदा आवक व दरदाम-महिना             आवक क्विंटल        किमान दर          कमाल दर          सरासरीनोव्हेंबर २०१८  १,१७,७००             ४०० रुपये              २००० रुपये          ७०० रुपयेनोव्हेंबर २०१९   ७३,८५५               १००० रुपये             १०,१०० रुपये    ४,००० रुपये

गेली वर्ष-दोन वर्षे कांद्याचा भाव पडल्याने कशाचाच ताळमेळ बसत नव्हता; मात्र महिन्याभरापासून दरात थोडी वाढ झाली असून, सध्याचा दर समाधानकारक आहे.- पंढरीनाथ माने,माचनूर, मंगळवेढा

अतिवृष्टी आणि नंतर अवकाळी पावसाने कांद्याच्या आवकेत घट झाल्याने दरात वाढ झालेली दिसते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.- मोहन सालपे, सचिव, बाजार समिती

पावसामुळे कांद्याची पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांकडे मालच नाही. सहा महिन्यांपूर्वी समितीत रोज ५० ते ६० गाड्या कांद्याची आवक होती, ती १0 गाडीवर आली आहे. त्यात गेले दोन दिवस अवकाळी पावसामुळे आवक एकदमच मंदावली.- मनोहर चूग, कांदा व्यापारी

 

 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर