कोल्हापूर रणांगण तापले
By Admin | Updated: September 27, 2014 00:11 IST2014-09-26T23:47:05+5:302014-09-27T00:11:15+5:30
सतेज पाटील : पाठिंबा देऊन ‘शब्द’ पाळला - जातीयवादी प्रवृत्तींना थारा नाही-- समरजितसिंह घाटगे : हसन मुश्रीफ

कोल्हापूर रणांगण तापले
जातीयवादी प्रवृत्तींना कागलमध्ये थारा नाही-- समरजितसिंह घाटगे : हसन मुश्रीफ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कागल : राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी आहे. जातीयवादी प्रवृत्तींना थारा न देण्याचा कागलचा इतिहास आहे. कागलच्या जनतेला २४ तास उपलब्ध असणारा आमदार हवा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार हवा आहे. विक्रमसिंहराजे आणि मुश्रीफ-पाटील आघाडी म्हणजे विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन शाहू दूध संघाचे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथील बापूसाहेब महाराज चौकात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित भव्य रॅलीच्या सांगता सभेत घाटगे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या. उमेदवार हसन मुश्रीफ, रणजितसिंह पाटील, भैया माने, दत्तामामा खराडे, सुनील सूर्यवंशी, युवराज पाटील, राजेंद्र जाधव, बॉबी माने, मनोहर पाटील, वसंत्
कार्यकर्ता हवा की पाहुणा..?
सतेज पाटील : लोकसभेवेळी पाठिंबा देऊन ‘शब्द’ पाळला
कोल्हापूर : मतदारसंघाचा कायापालट करणारा व तुमच्या प्रश्नांसाठी राबणारा कार्यकर्ता हवा की, निवडणुका लागल्यावर रिंगणात उतरलेला २० दिवसांचा पाहुणा उमेदवार हवा, अशी रोखठोक विचारणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज, शुक्रवारी येथे केली. मी जनतेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. त्याची परतफेड येत्या निवडणुकीत तुमचे बहुमोल मत देऊन करा, असे आवाहन पाटील यांनी केले.
कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीसह उत्साही वातावरणात शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आयोजित प्रचार प्रारंभाच्या सभेत ते बोलत होते. कळंबा रोडवरील तपोवन मैदानावरील काँग्रेसमय वातावरणातील सभेस माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, प्रल्हाद चव्हाण, डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, शांतादेवी पाटील, प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.
एकाच दिवशी ६८ उमेदवारांचे अर्ज
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता शुक्रवारचा सुमुहूर्त साधत आज जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह ६८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांवर छाप पाडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांनी केलेल्या जोरदार शक्तिप्रदर्शनाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून गेले. कोल्हापूर शहरासह तालुक्याची गावे आज जनसागराच्या गर्दीने फुलून गेली. जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात चौरंगी, पंचरंगी निवडणूक होत असल्याने आतापासूनच निवडणुकीला रंग भरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत. दहाही मतदारसंघांत जोरदार लढती होणार आहेत, याची प्रचिती आज उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या शक्तिप्रदर्शनातून आली. विशेषत: कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर व कोल्हापूर उत्तर, राधानगरी मतदारसंघांत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शनावर भर दिला होता. विविध प्रकारच्या वाहनांतून कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांना आणण्यात आले होते. कार्यकर्त्यांच्या दिमतीला मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा दिल्यामुळे सर्वत्र वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते.