शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजातर्फे उद्या कोल्हापूर ‘बंद’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:04 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी (जि. अहमदनगर) येथे सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी कोल्हापुरात उद्या, गुरुवारी पुकारण्यात आलेला बंद होईलच, असे सकल मराठा समाजातर्फे दिलीप देसाई, इंद्रजित सावंत व वसंतराव मुळीक यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत जाहीर केले.दिलीप देसाई म्हणाले, परळी येथील आंदोलन स्थगित झाले असले तरी ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी (जि. अहमदनगर) येथे सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी कोल्हापुरात उद्या, गुरुवारी पुकारण्यात आलेला बंद होईलच, असे सकल मराठा समाजातर्फे दिलीप देसाई, इंद्रजित सावंत व वसंतराव मुळीक यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत जाहीर केले.दिलीप देसाई म्हणाले, परळी येथील आंदोलन स्थगित झाले असले तरी येथील आंदोलन सुरू राहणार असून, बंदही शांततेत व शिस्तबद्धरीत्या पाळला जाईल. मराठा समाजबांधवांना तसे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत आंदोलनस्थळी भेट देऊन विविध गावे, संस्था, संघटनांच्या माध्यमातून पाठिंब्याची ४८७ पत्रे देण्यात आली आहेत. समाजबांधवांसाठी आचार-संहिता दिली असून तिचे पालन करावे.इंद्रजित सावंत म्हणाले, सकल मराठा समाजातर्फे उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. याचे अध्यक्षस्थान शाहू छत्रपती भूषविणार आहेत. सभेपूर्वी आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर राष्टÑगीत, शाहू गौरवगीत, महाराष्टÑ गीत व मराठा आरक्षण गीत होईल. या सभेत जिल्ह्यासह राज्यातील मान्यवर वक्ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाचपर्यंत ही सभा सुरू राहील.यावेळी प्रा. जयंत पाटील, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, फत्तेसिंह सावंत, स्वप्निल पार्टे, विनायक फाळके, राजू जाधव, आदी उपस्थित होते.आत्महत्या या मराठा आरक्षणासाठीचदोन दिवसांपूर्वी झालेल्या विनायक गुदगी यांच्या आत्महत्येचा संबंध मराठा आरक्षणाशी जोडू नये, असे मत पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केले होते. यावर मुळीक म्हणाले, होणाऱ्या आत्महत्या या मराठा आरक्षणासाठीच होत आहेत; कारण मराठा तरुण नोकºया मिळत नसल्याने नैराश्यातून हे पाऊल उचलत आहेत. कोणी काही म्हटले तरी हीच वस्तुस्थिती आहे.