शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : नक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 10:54 IST

कोल्हापूर जिल्ह्यात नक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर असून, त्यांची यादी ‘एटीएस’ पथकाकडे आहे. ठोस पुरावे आढळल्यास कोणत्याही क्षणी त्यांना उचलणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देनक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर लक्षपोलीस अधीक्षक : संशयितांची यादी एटीएसकडे; ठोस पुराव्यानंतर कारवाई

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात नक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर असून, त्यांची यादी ‘एटीएस’ पथकाकडे आहे. ठोस पुरावे आढळल्यास कोणत्याही क्षणी त्यांना उचलणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पुण्यात एल्गार परिषदेच्या आयोजनप्रकरणी पकडण्यात आलेल्या माओवाद्याच्या तपासात ‘थिंक टँक’मधील सदस्यांची नावे पुढे आली आहेत. त्यांतील बहुतांश उच्चशिक्षित आणि मानवी हक्क चळवळीतील प्रसिद्ध कार्यकर्ते आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील परिस्थितीबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, नक्षलवाद्यांच्या कारवायांचे ध्येय जंगलातील युद्धाचे शहरी भागातही पूरक वातावरण निर्माण करणे हे आहे. त्यानिमित्त पुस्तक प्रकाशन, विविध मेळावे घेणे, आदी कार्यक्रम केले जातात. सकृत्दर्शनी काही कार्यक्रमांत हे कार्यकर्ते वारंवार दिसून येतात. चांगल्या कामांत अनेकांना गुंतवून शांत डोक्याने हे आपल्या नक्षलवादी कारवाया सुरू ठेवतात. ठरावीक वेळानंतर तेच अशांततेचे काम करून सहकाऱ्यांचे लक्ष विचलित करतात.

शहरामध्ये वावरणाऱ्या अशा संशयित नक्षलवाद्यांवर कोल्हापूर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या हालचालींवर पोलिसांची बारकाईने नजर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांची नक्षलवादी संघटनांशी संलग्नता असल्याची माहिती ‘एटीएस’ पथकाच्या हाती लागली आहे.

त्यांच्यातील काहीजणांची यादीच तयार करण्यात आली असून, त्यांच्या हालचालींतून ठोस पुरावे आढळल्यास त्यांना कोणत्याही क्षणी उचलून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

कॅसिनो, व्हिडीओ पार्लरवर कारवाई करणारकोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कॅसिनो व व्हिडीओ पार्लरमार्फत सुरू असलेला जुगार हा मुळापासून उपटून काढणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. शहराच्या प्रमुख ठिकाणी चरस, गांजासारख्या अमली पदार्थांच्या विक्रीचे अवैध धंदे फोफावण्याची शक्यता आहे. त्यांना वेळीच लगाम घालणार असून सणांच्या कालावधीत गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी