शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कोल्हापूर : कर्नाटकचा अर्ज रद्द करून घेण्यासाठी प्रयत्न, सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:12 IST

सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारने २०१४ मध्ये दिलेला अर्ज रद्द करून साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम सुरू व्हावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्याचा निर्णय मुंबईत मंत्रालयात झालेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व या समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील होते. नवीन मुख्य सचिव दिनेशकुमार जैन प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देकर्नाटकचा अर्ज रद्द करून घेण्यासाठी प्रयत्नसीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीची बैठक मुख्यमंत्री ज्येष्ठ विधिज्ञांची भेट घेणार

कोल्हापूर : सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारने २०१४ मध्ये दिलेला अर्ज रद्द करून साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम सुरू व्हावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्याचा निर्णय मुंबईत मंत्रालयात झालेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व या समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील होते. नवीन मुख्य सचिव दिनेशकुमार जैन प्रमुख उपस्थित होते.

हा प्रश्न लवकर धसाला लागावा यासाठी मुख्यमंत्री व वरिष्ठ मंत्री लवकरच दिल्लीतील या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेल्या हरीश साळवे यांच्यासह वरिष्ठ विधिज्ञांची लवकरच भेट घेतील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.सकाळी साडेदहा वाजता मुख्य सचिवांच्या दालनात सुमारे दीड तास ही बैठक झाली. या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्यात तत्कालीन सरन्यायाधीश जे. पी. लोढा यांनी १२ सप्टेंबर २०१४ मध्ये साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी कर्नाटक सरकारने हा दावाच काढून टाकण्यात यावा, असा अर्ज (क्रमांक १२ ए) दिला. त्यामुळे मूळ दाव्याची सुनावणी बाजूला राहून या अर्जावरच सुनावणी सुरू आहे.

हा अर्ज निकाली काढण्यासाठी न्यायालयात बाजू मांडणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे व इतरांची राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या प्रश्नी समन्वयाची जबाबदारी असलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेणे आवश्यक आहे. ही भेट लवकरात लवकर होईल, असे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले.या प्रश्नात विविध क्षेत्रांतील आठजणांच्या साक्षी होणार आहेत. त्यामध्ये माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, निवृत्त अप्पर सहकार निबंधक दिनेश ओऊळकर, पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटचे अर्थतज्ज्ञ डॉ. राजेश परचुरे, डेक्कन कॉलेजच्या डीन व भाषातज्ज्ञ डॉ. सोनल कुलकर्णी, संस्कृतीचे अभ्यासक डॉ. मुराटकर, राज्य पुर्नरचनेचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार व डॉ. भारती पवार आणि लोकेच्छासंबंधी मालोजीराव अष्टेकर हे साक्ष देणार आहेत. त्यामुळे त्यांच्या साक्षी प्रतिज्ञापत्रावर तयार करून ठेवण्याच्या सूचना अ‍ॅडव्होकेट आॅन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांना करण्यात आल्या.बैठकीस अप्पर मुख्य सचिव बिपीन मलिक, मध्यवर्ती संयुक्त समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार अरविंद पाटील, श्री. अष्टेकर, श्री. ओऊळकर, प्रकाश मरगाळे, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :border disputeसीमा वादbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर