शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राजारामपुरीतील एटीएम सेंटर भरदिवसा फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:45 IST

राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही फुटांच्या अंतरावर असणारे बँक आॅफ इंडियाचे ए.टी.एम. सेंटर फोडण्याचा एका परप्रांतीयाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देराजारामपुरीतील एटीएम सेंटर भरदिवसा फोडण्याचा प्रयत्नपरप्रांतीयास अटक : पोलिसांच्या दक्षतेमुळे प्रयत्न फसला

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही फुटांच्या अंतरावर असणारे बँक आॅफ इंडियाचे ए.टी.एम. सेंटर फोडण्याचा एका परप्रांतीयाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

याप्रकरणी हरमेलसिंग संतोखसिंग धालीवाल (वय ३०, रा. पंजाब) या चोरट्याला रंगेहात पकडण्यात आले. याच पोलीस ठाण्यातील महिला पोलिसासह तिघा पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे हा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडील लोखंडी गज जप्त करण्यात आला.राजारामपुरी पोलीस ठाण्यात अर्चना जाधव या महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी त्या पोलीस ठाण्याजवळ असणाऱ्या बँक आॅफ इंडियाच्या ए.टी.एम. सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. त्यावेळी या सेंटरमध्ये एक चोरटा लोखंडी रॉडने ए.टी.एम. मशीन फोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी पोलीस जाधव यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी त्वरित ही घटना मोबाईलवरून पोलीस ठाण्यात कळविली.

पोलीस नाईक प्रकाश पारधी आणि भूषण ठाणेकर यांनी तत्काळ त्या ए.टी.एम. सेंटरकडे धाव घेतली. तसेच त्यांनी तातडीने त्या चोरट्याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून लोखंडी गज तसेच विविध बँकांची एटीएम कार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड असे साहित्य जप्त करण्यात आले आले.

आणखी गुन्हे उघडकीस येणारअटक केलेल्या हरमेलसिंग धालीवाल याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याबाबत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर व पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी त्याच्याकडे चौकशी केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर