शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा हिल मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी मारली बाजी; ऋतुजा पाटील, सोनाली देसाई विजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:07 IST

देशभरातून आलेल्या तब्बल ८ हजार २०० धावपटूंनी निसर्गाचे आव्हान स्वीकारत २१ किलो मीटरची ही खडतर शर्यत पूर्ण केली

कोल्हापूर : साताऱ्याच्या डोंगर-दऱ्यांत रविवारी रंगलेल्या १४ व्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्येकोल्हापूरच्या खेळाडूंनी बाजी मारली. महिला गटात कोल्हापूरच्या ऋतुजा पाटील, सोनाली देसाई यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेत देशभरातून आलेल्या तब्बल ८ हजार २०० धावपटूंनी निसर्गाचे आव्हान स्वीकारत २१ किलो मीटरची ही खडतर शर्यत पूर्ण केली. सातारा रनर्स फाउंडेशनने स्पर्धा आयोजिली होती. स्पर्धेला सकाळी ६:३० वाजता पोलिस परेड मैदानावरून सुरुवात झाली.ऋतुजा ही मूळच्या गडहिंग्लज येथील आहे. कुटुंबात क्रीडा क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमीवर नाही. तिच्या वडिलांचे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. ती स्थानिक शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करते. सन २०१६ पासून तिचा सातत्याने सराव सुरु आहे. खडतर प्रवास करत तिने मुंबई येथे झालेल्या दहा किलोमीटर चँलेज स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला. त्यानंतर पारगड (ता. चंदगड) येथे झालेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक पटकावून विजयी घाेडदौड सुरू ठेवली. ती डॉ. घाळी महाविद्यालयात बीएसस्सीच्या तिसऱ्या वर्षात शिकते. स्कूल गेम क्रॉसकंट्रीमध्ये तिने राष्ट्रीय पदक पटकाविले. विद्यापीठ इंटरझोन आणि एनसीसीत राष्ट्रीय सुवर्णपदक पदाची मानकरी असल्याची माहिती प्रशिक्षक हरिदास शिंदे यांनी सांगितले.सोनाली या पोलिस दलात कॉन्स्टेबल आहेत. शहापूर (इचलकरंजी) पोलिस ठाण्यामध्ये त्या कार्यरत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून त्या सराव करतात. घाटकोपर (मुंबई) येथील ऑल इंडिया पोलिस गेम्सही सराव करतात. पोलिस दलात रुजू होण्यापूर्वी त्यांनी क्रीडाक्षेत्रात चमक दाखविली आहे. हायस्कूल स्तरावर झालेल्या स्पर्धेतून राष्ट्रीय पदके पटकाविली आहे. गेल्या सहा वर्षापासून त्यांचा सराव सुरू आहे. त्यांची मोठी बहीण पोलिस दलात मुख्यालयात सेवेत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे सोनाली देसाई यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या पल्लवी मूग यांची बाजीया स्पर्धेत अठरा वर्षांच्या तरुणांपासून ते वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांनी देखील सहभाग घेतला. कोल्हापूरच्या पल्लवी मूग यांनी महिलांच्या ४५ ते ४९ वयोगटात प्रथम येणाऱ्या बहुमान पटकवला. त्यांनी २१ किलोमीटर अंतर १ तास ५९ मिनिटे आणि २८ सेकंदात पूर्ण केले.

स्पर्धेतील विजेते व त्यांनी नोंदविलेली वेळ !महिला गटात ऋतुजा विजय पाटील यांनी २१ किलोमीटरचे अंतर १ तास, ३० मिनिटे ५२ सेंकदात पूर्ण केले. तृतीय क्रमांक पटकाविलेल्या सोनाली धोंडिराम देसाई यांनी हे अंतर १ तास, ३३ मिनिटे ४२ सेंकदात पूर्ण केले.