शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

कोल्हापूर : आंबेडकर, मेवाणी, खलीद, कोळसे-पाटील यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:46 IST

शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ बुधवारी हिंदुत्त्ववादी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खलिद, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर भीमा-कोरेगांव दंगल घडविल्याप्रकरणी अटक करण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देआंबेडकर, मेवाणी, खलीद, कोळसे-पाटील यांना अटक कराहिंदुत्त्ववादी संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हजारो कार्यकर्ते सहभागी

कोल्हापूर : शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ बुधवारी हिंदुत्त्ववादी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खलिद, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर भीमा-कोरेगांव दंगल घडविल्याप्रकरणी अटक करण्याची मागणी करण्यात आली.मोर्चाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन व ध्येय मंत्राने साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिंदु चौक येथून झाली. मोर्चाच्या अग्रभागी भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा बिंदु चौक -आईसाहेब महाराज पुतळा- लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर- व्हीनस कॉर्नर - स्टेशनरोड- असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता प्रेरणा मंत्राने झाली.निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना दिलेल्या निवेदनात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘नक्षलवादी हे देशाचे मित्र आहेत’असे विधान केले आहे. त्यामुळे त्यांनी संविधानाच्या ‘ नागरीक मुलभूत कर्तव्याचा ’ अनादर केला आहे. याशिवाय सीआरपीएफ जवानांचाही घोर अपमान केला आहे. यासह प्रक्षोभ वक्तव्य करणाऱ्या उमर खलीद यांना एल्गार परिषदेत आणून वातावरणात आणखी तेढ निर्माण केला.

संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भीमा-कोरेगाव दंगलीत दगड फेकीचा खोटा आरोप करणाऱ्या महिलेला अटक करुन त्यांची नार्को टेस्ट घ्यावी. ३ जानेवारी २०१८ च्या दंगलीवेळी राहूल फटांगळे या युवकाची हत्या झाली. त्याच्या हत्येप्रकरणी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह सहकाऱ्यांना दोषी ठरवून हत्येचा गुन्हा नोंद करावा.

भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खलीद, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांना अटक करावी. या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात ‘भारतीय संविधान’ ची प्रत घेवून सहभागी झालेले बंडा साळुंखे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (सर्व छाया : आदित्य वेल्हाळ)

जिग्नेश मेवाणी, उमर खलीद, बी.जी.कोळसे पाटील,आदींच्यावर महाराष्ट्र बंद च्या दरम्यान झालेल्या अर्थिक, सार्वजनिक, खासगी मालमत्तेच्या नुकसानीला जबाबदार धरुन नुकसान भरपाई वसुल करावी व गुन्हे दाखल करावेत. कोल्हापूरसह इतर ठिकाणी पोलीस-पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या समाजकंटकानाही अटक करावी. या सर्व मागण्यांचा विचार करुन कारवाई न झाल्यास कोल्हापूर जिल्हा बंद पुकारण्यात येईल. असेही म्हटले आहे.यावेळी विविध हिंदुत्त्ववादी संघटनांच्यावतीने बंडा साळुंखे, महेश उरसाल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, माजी जिल्हा प्रमुख रवि चौगुले, मुरलीधर जाधव, शहराध्यक्ष दुर्ग्रेश लिंग्रज, किशोर घाटगे, तानाजी आंग्रे, विठ्ठल पाटील, सुनील सामंत, मनोहर सोरप, मधुकर नाझरे, श्रीकांत पोतनीस, अ‍ॅड. रणजित घाटगे, राजू यादव, जयराज हारुगले, दीपक गौड, रमेश खाडे, सुमित सुर्यवंशी, अ‍ॅड. केदार मुनीश्वर, कुलदीप गायकवाड, जयदीप शेळके, शिवानंद स्वामी, नगरसेवक राहूल चव्हाण, मेघना पेडणेकर, दिपाली शिंदे, नम्रता पाटील, सुवर्णा पवार, ऐश्वर्या मूनीश्वर, आदी उपस्थित होते.

हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे हे मोर्चात ‘भारतीय संविधान ’ची प्रत घेवून सहभागी झाले होते. तर कार्यकर्त्यांच्या हातामध्ये ‘धर्माच राजकारण करण्यापेक्षा समाज हिताच राजकारण करा’, ‘शाहू नगरीत संविधानाचा मान राखू, जातीपाती मुक्त करु ’, ‘ नक्षलवादी देशभक्त, तर पोलीस कोण ’ आदी घोषणा फलकांसह भिडे गुरुजींचे छायाचित्र असलेले फलक लक्ष वेधून घेत होते.

सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते बिंदुचौकात जमण्यास सुरुवात झाली. तत्पुर्वी सकाळी नऊ वाजल्यापासून अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली दिडशेहून अधिक पोलीस फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला होता. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.

 

 

 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीkolhapurकोल्हापूर