शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आॅनलाईन सातबाराची घोषणा पण काम अपूर्णच, सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 17:16 IST

राज्यातील सर्व सातबारा ३१ मार्च २०१८ पूर्वी आॅनलाईन होतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली? असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्दे आॅनलाईन सातबाराची घोषणा पण काम अपूर्णचसतेज पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न दिरंगाईमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार

कोल्हापूर : राज्यातील सर्व सातबारा ३१ मार्च २०१८ पूर्वी आॅनलाईन होतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली? असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.शेतकऱ्यांना अचूक संगणकीकृत सातबारा उतारा देण्यासाठी शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने कार्यक्रम हाती घेतला आहे. २००२ पासून सातबारा उतारा संगणकीकृत करण्यात आला होता; मात्र त्यामध्ये काही प्रमाणात त्रुटी आढळल्यामुळे शेतकऱ्यांना अचूक संगणकीकृत सातबारा उतारा देण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून केंद्रशासन पुरस्कृत डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉर्डनायझेशन प्रोग्रॅम अंतर्गत एडिट आणि रिएडिट मोड्यूल उपलब्ध करून देण्यात आले. आतापर्यंत पाचवेळा या प्रकल्पाला मुदतवाढ दिली.

३१ मार्च पूर्वी राज्यातील सर्व सातबारा आॅनलाईन होईल, अशी घोषणा महसूलमंत्र्यांनी केली, मात्र तरीही हे काम अद्याप अपूर्णच असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली? असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.

यावर खुलासा करताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गा. न. नं ७/१२ मधील त्रुटींवर दूर करण्यात आल्याचे सांगितले. राज्यातील एकूण ४३,९५६ गावांपैकी ४१८७६ गावांचे म्हणजेच ९५ टक्के कामकाज पूर्ण झाले असून त्या ठिकाणी गा. न. नं ७/१२ आॅनलाईन उपलब्ध होत आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे महसूलमंत्री पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील