शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वेदगंगा नदीत उडी घेणाऱ्या वृद्धाला रोखले, अबोल वृद्धा मुळे पोलिसांसमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 23:56 IST

Kolhapur News: आदमापूर येथील बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या तरुणांनी जर चपळता दाखवली नसती तर हा वृद्ध हा वेदगंगेच्या विस्तीर्ण पुराच्या पाण्यातून कुठे वाहत गेला असता याचा पत्ता ही लागला नसता.

- अनिल पाटीलमुरगूड  - दुपारी साडे तीनची वेळ! एक सारखा कोसळणारा धुवांधार पाऊस!सर्वत्र पसरलेले महापुराचे पाणी!मुरगूड निढोरी दरम्यान असणाऱ्या पुलावरचे ठिकाण!एखाद्या चित्रपटातचे शूटिंग सुरू आहे असाच प्रसंग! साठीतील एक वृद्ध वेदगंगा नदीवरील पुलावर मधोमध येतो, हातातील पिशवी कडेला ठेवून चपला काढून नदीच्या पाया पडून क्षणार्धात संरक्षक कठड्यावर चढतो..! प्रचंड वेगाने वाहणाऱ्या आणि काठोकाठ भरलेल्या नदीच्या पात्रात उडी मारणार इतक्यात जवळील तरुण धावतात आणि त्याला पकडून खाली ओढतात..! एक जीव वाचला पण पुढं काय....? 

ही घटना मन सुन्न करणारी आहे. ही अनोळखी वृद्ध कोठून आला आहे.त्याचे नाव गाव याचा काही ही पत्ता नाही.जवळ कोणताच ओळखीचा पुरावा नाही.आदमापूर येथील बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या तरुणांनी जर चपळता दाखवली नसती तर हा वृद्ध हा वेदगंगेच्या विस्तीर्ण पुराच्या पाण्यातून कुठे वाहत गेला असता याचा पत्ता ही लागला नसता.मृतदेह ही मिळाला नसता.तरुणांनी दाखवलेल सामाजिक भान नक्कीच कौतुकास्पद आहे. या वृद्ध व्यक्तीला सावरून त्याची अदबीने चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण मला सोडा, मला सोडा इतकेच शब्द त्या वृद्धांच्या तोंडातून बाहेर पडत होते.गाव नाव याबाबत तो चकार शब्द बोलत नाही.त्याला आठवत नाही की सांगायचेच नाही हेही समजत नव्हते.त्यामुळे या तरुणांनी तात्काळ मुरगूड पोलिसांशी सम्पर्क साधून घटनेची माहिती दिली.         पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या वृद्धाला ताब्यात घेतले.सांयकाळ पासून पोलिसांनी ही कसून चौकशी केली पण त्यांची कोणतीच ओळख मिळत नाही.भाषेवरून ही व्यक्ती सीमा भागातील असावी असा अंदाज पोलीस वर्तवत आहेत.रात्री उशिरा पर्यंत पोलिसांनी ही अनेक सामाजिक संस्थेशी संपर्क केला आहे पण कोठून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी सांगितले.दरम्यान जर ही व्यक्ती ओळखीची वाटल्यास तात्काळ मुरगूड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर