शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात सर्व वाहनांना प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 13:37 IST

कोल्हापूर येथील शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या परिसरात सर्व वाहनांना पार्किंगसाठी व प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिर परिसरात सर्व वाहनांना प्रवेशबंदीशारदीय नवरात्रौत्सवानिमित्त वाहतूक नियोजन

कोल्हापूर : येथील शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या परिसरात सर्व वाहनांना पार्किंगसाठी व प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांना चांगली सुविधा मिळावी, या दृष्टीने पोलिसांनी हे नियोजन केले आहे, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी केले आहे.शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. दि. १० ते १८ आॅक्टोबरअखेर मोठ्या प्रमाणात नवरात्रौत्सव साजरा होत आहे. मंदिराची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मंदिर परिसरात शिवाजी चौक ते भवानी मंडप या मार्गावर एकाही वाहनास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिर परिसरातील सर्व वाहनतळ इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत.

हा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. या परिसरात वाहन पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक नियोजनास वाहनचालक व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक गुजर यांनी केले आहे.मोटार वाहन पार्किंग व्यवस्था शिवाजी स्टेडियम, सर्व प्रकारची मोटार वाहने, प्रायव्हेट हायस्कूल- चारचाकी, एम. एल. जी. हायस्कूल- दुचाकी, मेन राजाराम हायस्कूल- दुचाकी, चारचाकी, दसरा चौक मैदान- मिनी आरामबस, सिद्धार्थनगर मैदान- आरामबस, मिनी बसेस, पंचगंगा घाट- आरामबस, मिनी बसेस, गांधी मैदान- सर्व प्रकारची वाहने, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल मैदान- चारचाकी, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील मोकळी जागा- आरामबस, मिनी बसेस, बिंदू चौक-चारचाकी, मैलखड्डा (निर्माण चौक), सुसूरबाग मैदान - सर्व प्रकारची वाहने. 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूरAmbadevi Mandirअंबादेवी संस्थान