कोल्हापूर- आकाश कोरगांवकर ‘वर्ल्ड आयर्न मॅन’- भारतामधून फक्त दोघांनीच या स्पर्धेत सहभाग घेतला होता. (

By Admin | Updated: July 30, 2014 00:29 IST2014-07-30T00:20:17+5:302014-07-30T00:29:43+5:30

कोल्हापूरच्या क्रीडा जगतात आणखी एक विजयांचा झेंडा

Kolhapur - Akash Kargaonkar 'World's Iron Man' - Only two people from India participated in this competition. ( | कोल्हापूर- आकाश कोरगांवकर ‘वर्ल्ड आयर्न मॅन’- भारतामधून फक्त दोघांनीच या स्पर्धेत सहभाग घेतला होता. (

कोल्हापूर- आकाश कोरगांवकर ‘वर्ल्ड आयर्न मॅन’- भारतामधून फक्त दोघांनीच या स्पर्धेत सहभाग घेतला होता. (

कोल्हापूर : स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड टेफस्ट रेस स्पर्धेत कोल्हापूरच्या आकाश अमोल कोरगांवकरने ‘वर्ल्ड आयर्न मॅन’ चा किताब पटकाविला. कोल्हापूरच्या क्रीडा जगतात आणखी एक विजयांचा झेंडा रोवला आहे.
तब्बल १८२ किमी सायकलिंग, ४२ किलोमीटर धावणे व चार किमी जलतरण असे या स्पर्धेचे स्वरुप आहे. तसचे सलग १६ तासात पूर्ण करावयाची रेस आकाशने अवघ्या १५ तासातच पूर्ण करून आपले ध्येय गाठले. ही
स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे पहिले पाचशे स्पर्धेक विजते मानले जातात.
पहिल्या पाच स्पर्धकांना वर्ल्ड आयर्न मॅनचा किताब दिला जातो. त्यामध्ये आकाशने बाजी मारली आहे. यावर्षी स्पर्धेत २ हजार ६०० स्पर्धक सहभागी झाले होते. आकाशने ४ किलोमीटर पोहणे १ तास ४७ मिनिटात, सायकलिंग १८२ किलोमीटर ७ तास १० मिनिटांत, धावणे ४२ किलोमीटर ५ तास ५५ मिनिटामध्ये पूर्ण केले. भारतामधून फक्त दोघांनीच या स्पर्धेत सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Kolhapur - Akash Kargaonkar 'World's Iron Man' - Only two people from India participated in this competition. (

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.