कोल्हापूर--अजित कोरे यांना मारहाण

By Admin | Updated: August 29, 2014 00:46 IST2014-08-29T00:45:40+5:302014-08-29T00:46:34+5:30

मिरवणूक पुढे नेण्यावरून दोन मंडळांत वादावादी

Kolhapur - Ajit Core killed | कोल्हापूर--अजित कोरे यांना मारहाण

कोल्हापूर--अजित कोरे यांना मारहाण

कोल्हापूर : मिरवणूक पुढे नेण्याच्या कारणातून धनंजय महाडिक युवाशक्तीचे शहर अध्यक्ष अजित कोरे यांना संभाजीनगर येथील एका तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मिरजकर तिकटी येथे रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, संबंधित मंडळ व अजित कोरे यांच्या परसू ग्रुप या मंडळाची गणपती मिरवणूक मिरजकर तिकटी येथे आली. या ठिकाणी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मिरवणूक पुढे नेण्यावरून वादावादी झाली. यावेळी संतप्त झालेल्या संबंधित तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल बडविण्याच्या काठ्यांनी कोरे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये कोरे यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. यामुळे एकच गोंधळ उडाला. जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना पांगविले. त्यानंतर कोरे सीपीआरमध्ये उपचार घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास आले. दरम्यान, राजकीय हस्तक्षेप होऊन हे प्रकरण आपआपसात मिटविण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Kolhapur - Ajit Core killed