शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

कोल्हापूर विमानतळ टर्मिनल इमारतीचे काम १० डिसेंबरपर्यंत होईल, प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 15:24 IST

विमानतळावर आयएलएस सिस्टीम

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरील विस्तारित आणि सुधारित टर्मिनल इमारतीचे काम येत्या १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार यांनी रविवारी खासदार धनंजय महाडिक यांना दिली. एक दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या संजीवकुमार यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत सुरू असलेल्या टर्मिनल बिल्डिंगची पाहणी केली. यावेळी त्यांनी टर्मिनल बिल्डिंगच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. दरम्यान, या बिल्डिंगचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले.गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेल्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचीही त्यांनी जवळपास एक तास फिरून पाहणी केली. दर्शनी भागात दिला जाणारा ऐतिहासिक लूक, इमारतीमधील व्हीआयपी लाउंज, अंतर्गत सुविधा यांची बारकाईने पाहणी केली. काही किरकोळ सूचनाही संबंधितांना दिल्या. तत्पूर्वी, खासदार धनंजय महाडिक यांनी संजीवकुमार यांचे स्वागत केले. यावेळी खा. महाडिक यांनी त्यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूरला आवश्यक असणाऱ्या नवीन विमानसेवा आणि विमानतळाविषयी असणाऱ्या समस्या मांडल्या. यावेळी विमानतळ प्राधिकरण संचालक अनिल शिंदे, समीर शेठ, प्रशांत वैद्य आदी उपस्थित होते.

लोकार्पणाचा मुहूर्त डिसेंबरअखेरया दौऱ्यात संजीवकुमार यांनी टर्मिनल बिल्डिंगच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. इमारतीमधील अंतर्गत कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील. मात्र, दर्शनी भागातील ऐतिहासिक लूकचे काम पूर्ण होण्यास आणखी १० दिवस लागण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने टर्मिनल बिल्डिंगच्या लोकार्पणाची तारीख ठरविली जाणार आहे. दरम्यान, डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा, यासाठी आतापासून प्रयत्न करत असल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले.

विमानतळावर आयएलएस सिस्टीमहे विमानतळ अत्याधुनिक हवाई सोयी-सुविधांनी परिपूर्ण व्हावे, यासाठीही या विमानतळावर आयएलएस सिस्टीम बसवण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. पावसाळी हवा किंवा दाट धुक्यामुळे कमी झालेल्या दृश्यमान स्थितीमध्ये विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरण्यासाठी ही सिस्टीम उपयुक्त आहे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा खंडित होणार नाहीकोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा खंडित होणार नाही, यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे प्रयत्न करत आहे. नांदेड, नागपूर, शिर्डी, इंदोर, गोवा या मार्गावर हवाई सेवा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. सध्या बंद असणारी कोल्हापूर- अहमदाबाद हवाईसेवा जानेवारी अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता खासदार महाडिक यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा खंडित होणार नाही. याबाबत संजीवकुमार यांच्याशी चर्चा केली आहे. आयएलएस सिस्टीम बसवण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. -धनंजय महाडिक, राज्यसभा सदस्य.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक