शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवा, रस्त्यांचे रुंदीकरण करा - शाहू छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:35 IST

कोल्हापूर विमानतळावर विमान प्रशिक्षण सेंटरचा प्रस्ताव

कोल्हापूर : उजळाईवाडी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवावी, विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणासह रस्त्याच्या दोन्ही बाजूने पथदिवे लावावेत, अशा सूचना सोमवारी झालेल्या बैठकीत खासदार शाहू छत्रपती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.उजळाईवाडी विमानतळ सल्लागार समितीची २०२४ या वर्षाची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस., महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, करवीर प्रांताधिकारी हरिश धार्मिक, विमानतळ संचालक अनिल शिंदे यांच्यासह सल्लागार समिती सदस्य व्ही.बी. पाटील, किरण पाटील, तेज घाटगे, पार्थ नागेशकर, उजळाईवाडी सरपंच उत्तम आंबवडे तसेच संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासह नवीन हवाई मार्गावर विमानसेवा सुरु करणे, विमानतळावरील कार्गो सुविधा, महामार्ग ते विमानतळ रस्ता व पथदिवे, प्रवाशांना बस सुविधा पुरविणे, विमानतळ परिसरातील दोन गावांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे आदी मुद्द्यांसह इतर महत्वाच्या तांत्रिक मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा झाली.विमानतळाच्या धावपट्टीचे रुंदीकरण तातडीने पूर्ण करावे तसेच विमानतळाकडे जाणारे सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे, या रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पथदिवे बसवावेत. त्याचीही प्रक्रिया तातडीने राबवावी, अशा सूचना शाहू छत्रपती यांनी दिल्या. प्रवाशांना विमानतळावर आल्यानंतर चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात असेही त्यांनी सांगितले.विमानतळावरून कोल्हापूर शहरात येणासाठी ऑटोरिक्षांसह अन्य वाहनचालकांकडून जादा भाडे घेतले जात असल्याच्या तक्रारीवर बैठकीत चर्चा झाली. जर वाहनधारक भरपूर भाडे आकारत असतील तर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार असा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला. त्यावेळी केएमटी प्रशासनाने विमानाच्या वेळेत बस सुरु ठेवण्याची सूचना पुढे आली. त्यावेळी मंजूलक्ष्मी यांनी, केएमटीकडे सध्या बस संख्या कमी असल्याने आता तातडीने बस उपलब्ध करुन देणे अशक्य आहे. पण जेव्हा शंभर ई बसेस येतील तेव्हा ही सुविधा देता येऊ शकते असे सांगितले.विमान प्रशिक्षण सेंटरचा प्रस्तावविमान चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर परवानगी देण्याकरिता मुंबईतील एका खासगी कंपनीने प्रस्ताव दिला आहे. याबाबत सर्व बाबींची पूर्तता करून लवकरच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे संचालक अनिल शिंदे यांनी बैठकीत सांगितले. त्यानुसार १८ सप्टेंबरच्या दरम्यान याबाबत बैठक घेऊन, विमान प्रशिक्षण देण्याकरिता लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विमानतळाचे संचालक शिंदे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ