शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ऐन हंगामात रेल्वेस्थानकांतील आरक्षण खिडकी बंद, प्रवाशाच्या मोठ्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:53 IST

ऐन उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना कोल्हापुरातील रेल्वेस्थानकावरील सध्या अस्तित्वात असलेल्या तीन आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी बंद आहे. दोन तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागत असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे ऐन हंगामात रेल्वेस्थानकांतील आरक्षण खिडकी बंद प्रवाशाच्या मोठ्या रांगा; प्रशासनाचे दुर्लक्ष

कोल्हापूर : ऐन उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना कोल्हापुरातील रेल्वेस्थानकावरील सध्या अस्तित्वात असलेल्या तीन आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी बंद आहे. दोन तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागत असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथील आरक्षण कक्षातील एक आरक्षण खिडकी बंद असल्याने अन्य दोन खिडक्यांबाहेर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. (छाया : दीपक जाधव)शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुटी पडल्याने पर्यटनासह गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथील आरक्षण कक्षातील तीन तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी गेल्या महिन्याभरापासून बंद असल्याने, दोन खिडक्यांवर तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

बंद खिडकीमुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. तिकीट खिडक्यांवरचाही ताण काही प्रमाणावर कमी करण्यासाठी तिसरी खिडकी सुरू करणे गरजेचे आहे. मात्र अपुरे कर्मचारी व काही कर्मचारी सुटीवर गेल्याने ही खिडकी बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासन सांगत आहे. पुरेसे कर्मचारी नियुक्तीबाबत वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक रेल्वे अधिकारी सांगत आहेत.रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी येथे दररोज ४०० ते ४५० आरक्षणाचे अर्ज भरले जातात. त्यामुळे दिवसाकाठी आरक्षणातून मिळणारे उत्पन्न लाखोंच्या घरात आहे. मात्र सध्या दोनच खिडक्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आरक्षण केंद्रावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

 

रिक्त पदे तत्काळ भरावीकोल्हापुरातील आरक्षण कक्षासाठी १२ कर्मचारी पदे मंजूर आहेत. त्यांपैकी सध्या नऊ कर्मचारी कार्यरत आहेत. आणखी तीन कर्मचाऱ्यांची गरज आहे. बंद खिडकीमुळे अन्य दोन खिडक्यांवर नेहमी गर्दी असते. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग होतात. प्रशासनाने तत्काळ रिक्त पदे भरून ही खिडकी सुरू करावी.- शिवनाथ बियाणी,सदस्य, पुणे विभागीय सल्लागार समिती

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे