शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्ड स्टोरेजसाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती देणार जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 17:31 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती ने कोल्ड स्टोरेजसाठी भाडेतत्त्वावर १७ हजार चौरस फूट जागा देणार आहे. त्यासाठी निविदा मागवल्या असून भाड्याबरोबर स्टोरेजमधील दहा टक्के जागा समितीसाठी राखीव राहणार आहे.बाजार समितीमध्ये येणाऱ्या  शेतीमाल ठेवण्यासाठी गेले अनेक वर्षे कोल्ड स्टोरेजची मागणी होत आहे. समितीच्या प्रत्येक पदाधिकारी निवडीवेळी नूतन सभापती, उपसभापती ...

ठळक मुद्देनिविदा मागवल्या दहा टक्के माल ठेवण्यास समितीस मुभा

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने कोल्ड स्टोरेजसाठी भाडेतत्त्वावर १७ हजार चौरस फूट जागा देणार आहे. त्यासाठी निविदा मागवल्या असून भाड्याबरोबर स्टोरेजमधील दहा टक्के जागा समितीसाठी राखीव राहणार आहे.बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतीमाल ठेवण्यासाठी गेले अनेक वर्षे कोल्ड स्टोरेजची मागणी होत आहे. समितीच्या प्रत्येक पदाधिकारी निवडीवेळी नूतन सभापती, उपसभापती कोल्ड स्टोरेज, गूळ निर्यात झोनची आश्वासने देत राहिले; पण या कामास गती मिळाली नव्हती.

माजी सभापती सर्जेराव पाटील व विद्यमान सभापती कृष्णात पाटील यांनी हा विषय गांभीर्याने घेतला. सुरुवातीला समितीच्यावतीने कोल्ड स्टोरेज बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. एक टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज उभा करण्यासाठी १८ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे तीनशे टनासाठी किमान साडेपाच कोटी खर्च अपेक्षित होता.

एवढी मोठी गुंतवणूक करावी लागणार त्याशिवाय मंत्रालयाच्या पातळीवर मंजुरीसाठी ताकद खर्च करावी लागणार असल्याने समिती प्रशासनाने स्वत: बांधायचा निर्णय बदलला.समिती आवारातील १७ हजार चौरस फूट जागेत तीन हजार टन क्षमतेचे भाडेतत्त्वावर कोल्ड स्टोरेज बांधण्यासाठी निविदा मागवली आहे. सोमवारपासून निविदा मागवल्या असून दि. २६ डिसेंबरपर्यंत आॅनलाईन निविदा दाखल करायच्या आहेत.

या निविदा दि. २७ किंवा २८ डिसेंबरला खुल्या जाणार आहेत. सध्या समिती आवारात खासगी तीन कोल्ड स्टोरेज आहेत. तीनशे टनाचा एक तर दोनशे टनाचे दोन स्टोरेज आहेत. त्याठिकाणी व्यापारी आपला माल ठेवतात.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvegetableभाज्या