शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक: अकरा माजी संचालक ठरले अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:59 IST

आठ जणांच्या अर्जावर स्वत:च्याच सह्या नाहीत

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अकरा माजी संचालकांसह एकूण ९० उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. यामध्ये माजी अध्यक्ष नंदकुमार वळंजू, शशीकांत आडनाईक, उदयसिंह पाटील कावणेकर, दशरथ माने या मातब्बर उमेदवारांचा समावेश आहे. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून २८ एप्रिलला मतदान आहे. माघारीनंतर निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. ६४५ इतक्या मोठ्या संख्येने अर्ज पात्र ठरले असून आता माघारीसाठी अनेकांची मनधरणी करण्याची वेळ येणार आहे.बुधवारी दिवसभर बाजार समितीच्या कार्यालयात छाननी झाली. उमेदवारांनी वकील देऊन आपली बाजू मांडली. गुरूवारी दुपारी बारा वाजता पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांच्या आदेशानुसार लावण्यात आली. यावेळी चंद्रकांत ओतारी, मिलिंद ओतारी उपस्थित होते.वळंजू यांचा अडते व्यापारी संघातून अर्ज होता. परंतु बाजार समितीचे येणे असल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरवण्यात आला. शशिकांत आडनाईक यांचे कृषी पतसंस्था, सर्वसाधारण आणि मागासवर्गीय प्रतिनिधी आणि ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा तीन गटातून अर्ज भरले होते. येणे बाकीच्या कारणावरून हे तीनही अर्ज बाद ठरवण्यात आले.उत्तम धुमाळ (रा. बोरगाव ता. पन्हाळा), दशरथ माने (केर्ले ता. करवीर), उदयसिंग पाटील कावणे, संजय जाधव हणमंतवाडी ता. करवीर, आशालता पाटील म्हाकवे ता. कागल, नेताजी पाटील मांगोली ता. राधानगरी, अमित कांबळे भाटणवाडी ता. करवीर आणि हमाल मापाडी संघातून बाबूराव खोत यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला आहे. महिला मतदार संघातील शेळेवाडीच्या संगीता पाटील यांचाही अर्ज बाद ठरला.

दहाही माजी संचालकांची येणे बाकी

या दहाही माजी संचालकांची बाजार समितीची येणे बाकी असल्यामुळे यांना अपात्र करण्यात आले आहे. आपण ज्या संस्थेत अध्यक्ष, संचालक म्हणून काम केले आहे. तिथली थकबाकी ठेवून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या या इच्छुकांना साधे नियमही माहिती नाहीत का अशी चर्चा बाजार समितीच्या आवारात सुरू होती.

आठ जणांच्या अर्जावर स्वत:च्याच सह्या नाहीतएखादी निवडणूक लढवताना ती फारसा विचार न करता कशी लढवायचा निर्णय घेतला जातो याचे उत्तम उदाहरण छाननीच्या निमित्ताने समोर आले आहे. यातील आठ जणांनी उमेदवारी अर्जावर स्वत:ची सही ही केलेली नाही. विष्णू पाटील, रमेश चौगले, संदीप जामदार, सुभाष जाधव, मारूती झांबरे, मनिषा पाटील, उमेश शिगे, बाळासाेा दाईंगडे यांच्या अर्जावर सह्याच नाहीत. तर अनेकांनी ज्या गटातून अर्ज दाखल केले आहेत. त्या गटातील सूचक आणि अनुमोदकाची नावे आणि सह्या घेण्याचीही तसदी घेतलेली नाही.

राजकीय दबावापोटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमचे अर्ज अपात्र ठरवले. याविरोधात जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपील केले आहे. तसेच उच्च न्यायालयातही दाद मागणार आहे. - नंदकुमार वळंजू, माजी अध्यक्ष, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमतदारसंघनिहाय पात्र उमेदवारअ) कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सह. संस्था मतदारसंघ१ सर्वसाधारण प्रतिनिधी २८१२ महिला प्रतिनिधी ५४३ विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रतिनिधी २२४ इतर मागास. प्रतिनिधी ७८ब) ग्रामपंचायत मतदारसंघ५ सर्वसाधारण प्रतिनिधी १३३६ अनु. जाती/जमाती प्रतिनिधी २१७ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधी २७क) अडते व व्यापारी मतदारसंघ८ अडते व व्यापारी मतदारसंघ १५ड) हमाल व मापाडी मतदार संघ९ हमाल व मापाडी मतदारसंघ १४

बाजार समितीचे अपात्र झालेले उमेदवार आणि त्यांची थकबाकी

  • अमित कांबळे : १० लाख १० हजार रुपये
  • उदयसिंग पाटील ४ लाख १४९
  • संगीता पाटील २ लाख ८९ हजार ४७४
  • आशालता पाटील २ लाख ८० हजार
  • नेताजी पाटील १ लाख ९५ हजार ०६८
  • शशिकांत आडनाईक १ लाख ५६ हजार
  • नंदकुमार वळंजू १ लाख ५० हजार
  • उत्तम धुमाळ ७७ हजार ०४५
  • दशरथ माने ५६ हजार ८५९
  • संजय जाधव ५६ हजार ६५६
  • बाबूराव खोत ५० हजार
टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड