शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

कोल्हापूर : अखेर आबदार शिवाजी पूल कामकाजातून कार्यभारमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:38 IST

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार यांच्याकडील पर्यायी शिवाजी पुलाचे कामकाज काढून घेण्यात आल्याचे आदेश कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी बुधवारी दिले. याबाबतच्या आदेशाची प्रत त्यांनी कृती समितीला दिली.

ठळक मुद्दे अखेर आबदार शिवाजी पूल कामकाजातून कार्यभारमुक्तकार्यकारी अभियंत्यांना कृती समितीचा तीन तास घेराओ

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार यांच्याकडील पर्यायी शिवाजी पुलाचे कामकाज काढून घेण्यात आल्याचे आदेश कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी बुधवारी दिले. याबाबतच्या आदेशाची प्रत त्यांनी कृती समितीला दिली. तत्पूर्वी कृती समितीने कांडगावे यांना तीन तासांचा घेराओ घातला होता.शिवाजी पुलाचे उर्वरित काम सुरू असताना, त्यामध्ये वरिष्ठांना त्यांनी चुकीचा अहवाल देऊन कामात तांत्रिक अडचणी निर्माण केल्या. याबद्दल कृती समितीने आबदार यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन पुकारले होते. त्यानुसार आंदोलकांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांची भेट घेतली. यात आबदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर कांडगावे यांनी ‘मला निलंबन करण्याचे अधिकार नाहीत,’ असे समितीला सांगितले.

यावर समाधान न झाल्याने समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा ते दुुपारी दोन वाजेपर्यंत असे तीन तास कांडगावे यांच्या दालनात ठिय्या मारत त्यांना घेराओ घातला. अखेर कांडगावे यांनी वरिष्ठ मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनीही आंदोलकांना मला त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.आंदोलकांतर्फे समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी ‘हा पोरखेळ थांबवा; लाखो लोकांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे,’ असे बोल सुनावत फोन बंद करून कार्यालयास टाळे ठोकण्याची भूमिका घेतली.

या भूमिकेमुळे कांडगावे यांनीही नरमाईचे धोरण स्वीकारत, ‘कामकाज काढून घेण्याचे अधिकार मला आहेत. त्याप्रमाणे मी कारवाई करतो,’ असे सांगितले. त्यानंतर आंदोलकांनीही ‘तसे लेखी पत्र द्या; अन्यथा सायंकाळपर्यंत दारात ठिय्या मारतो,’ असेही सुनावले.

यावेळी कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी आबदार यांच्यावर कारवाईच्या पत्राची प्रतही दिली. यात आबदार हे पूर्वसूचना देऊनही बैठकीस अनुपस्थित राहिले नाहीत. तसेच कार्यालयीन पत्रव्यवहार व पुलासंबंधी इतर माहिती सोशल मीडियावर टाकून जनतेमध्ये गैरसमज व संभ्रम निर्माण केला. याद्वारे त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ७ व ८ चा भंग केला. त्यानुसार पुलाचे कामकाज काढून घेत असल्याचा आदेश दिला. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी सतीशचंद्र कांबळे, बाबा पार्टे, किशोर घाटगे, चंद्रकांत यादव, जयकुमार शिंदे, विजय करजगार, अशोक भंडारी, फिरोजखान उस्ताद, तानाजी पाटील, जयकुमार शिंदे, दिलीप माने, कुमार खोराटे, रणजित काकडे, महादेव आयरेकर, सचिन बिरंजे, सुनील पाटील, आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर