शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : एक बाळ पून्हा पालकांच्या कुशीत, इचलकरंजीतील बाळ विक्री प्रकरणी दुसऱ्या बाळाची होणार दत्तक प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 15:59 IST

इचलकरंजीतील डॉक्टरकडून बाळांची विक्री करण्यात आलेले प्रकरण मागील आठवड्यात उघडकीस आले. त्यातील एका बाळ पून्हा पालकांच्या कुशीत विसावले आहे. तर दुसऱ्या बाळाची दत्तक प्रक्रिया होवून ते बाळासाठी नोंदणी केलेल्या पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएक बाळ पून्हा पालकांच्या कुशीतइचलकरंजीतील बाळ विक्री प्रकरणी दुसऱ्या बाळाची होणार दत्तक प्रक्रिया

कोल्हापूर : इचलकरंजीतील डॉक्टरकडून बाळांची विक्री करण्यात आलेले प्रकरण मागील आठवड्यात उघडकीस आले. त्यातील एका बाळ पून्हा पालकांच्या कुशीत विसावले आहे. तर दुसऱ्या बाळाची दत्तक प्रक्रिया होवून ते बाळासाठी नोंदणी केलेल्या पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्याच्या दत्तक विधानसंबंधीची कोणतिही कायदेशीर प्रक्रिया न केलेल्या पालकांचा पैसा तर गेलाच पण आता त्यांना शिक्षेचेही धनी व्हावे लागणार आहे.आठ दिवसांपूर्वी इचलकरंजी येथील डॉ. अरूण पाटील यांच्या दवाखान्यातून दोन बाळांची अवैधरित्या विक्री करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. दत्तक प्रक्रियेला होत असलेला उशीर या कारणात्सव दांपत्यांकडून हे पाऊल उचलले गेले असले तरी यातील मुंबईच्या दांपत्याला दिलेले दहा दिवसांचे बाळ आता नऊ महिन्यांचे आणि चंद्रपूरच्या दांपत्याला दिलेले चार दिवसांचे बाळ आता अडीच महिन्यांचे आहे.

या प्रकरणानंतर या दोन्ही बाळांना बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले. एक बाळ बालकल्याण संकुलात तर दुसरे बाळ डॉ. प्रमिला जरग यांच्या शिशूआधार केंद्रात आहे.

बालकल्याण संकुलकडे देण्यात आलेल्या नऊ महिन्याच्या बाळाला पालकांचा इतका लळा लागला की पालकांची ताटातूट झाल्यापासून ते पाच सहा दिवस खूप रडत होते. मुंबईच्या डॉक्टर दांपत्याने या बाळाची रजिस्ट्रारकडे नोंदणी केल्याने बालकल्याण समितीने कागदपत्रांची छाननी आणि पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेवून हे बाळ पून्हा पालकांकडे सोपवले आहे.दुसरे बाळ अडीच महिन्यांचे असल्याने अजूनही त्याला पालकांविषयीची समज नाही. हे बाळ दत्तक घेतलेल्या चंद्रपूरच्या दांपत्याने दोन लाख रुपये दिले आणि बाळ नेले. पुढे कोणतिही कायदेशीर प्रक्रिया न केल्याने त्यांना अटक झाली आहे.

अवैधरित्या केलेल्या या प्रकारामुळे पैसा जायचा तो गेलाच. बाळापासून ताटातूट झालीच पण आता तपास आणि शिक्षेची टांगती तलवारही आहे. शिवाय झालेली बदनामी आणि मनस्ताप या गोष्टी कोणत्याही परिमाणात मोजता येणार नाही.

बाळ आता दुसऱ्या दांपत्याकडेचंद्रपूरच्या दांपत्याने खरेदी केलेले हे अडीच महिन्याचे बाळ कुमारी मातेचे आहे. त्यामुळे कायदेशीररित्या हे बाळ दत्तक देण्यास ती तयार आहे का हे लिहून घेतले जाईल. त्यानंतरही विचार करण्यासाठी तिला ६० दिवसांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर हे बाळ दत्तक देण्यासाठी मुक्त झाले आहे असे पत्र शासनाला पाठवले जाते.

आॅनलाईनद्वारे दत्तक बाळासाठी अर्ज केलेले आणि वेटिंग लिस्टमध्ये असलेले कूटूंब बाळ पाहण्यासाठी पाठवले जाते अशारितीने हे बाळ आता दुसऱ्या दांपत्याला देण्यात येईल अशी माहिती डॉ. प्रमिला जरग यांनी दिली.

 

मुंबईच्या दांपत्याने कारा अंतर्गत बाळाची दत्तक नोंदणी केली आहे. चंद्रपूरच्या दांपत्याने पैसे देवून बाळ नेले आणि हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर मानवी तस्करी, बाल न्याय अधिनियम ८० अशी कलमं लावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना हे बाळ परत देता येणार नाही.प्रियो चोरगे, अध्यक्षा. महिला बालकल्याण समिती 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChildren Dayबाल दिन