शिशू आरोग्य केंद्र आशेचा किरण - गडकरी

By admin | Published: March 31, 2017 06:57 AM2017-03-31T06:57:53+5:302017-03-31T06:57:53+5:30

मुंबई पोर्ट ट्रस्टने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत उभारलेल्या शुश्रूषा केंद्राचे उद्घाटन

Shishu Health Center hope ray - Gadkari | शिशू आरोग्य केंद्र आशेचा किरण - गडकरी

शिशू आरोग्य केंद्र आशेचा किरण - गडकरी

Next

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत उभारलेल्या शुश्रूषा केंद्राचे उद्घाटन करण्याची संधी मिळणे ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब असल्याची भावना केंद्रीय जहाज वाहतूक रस्ते, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या या तीन इमारती आणि १.२ एकर परिसराचा एका वर्षाच्या आत विकास करून तिथे मुलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आनंदी वातावरण असलेले हे शुश्रूषा केंद्र उभारण्यात आले आहे. कॉटन ग्रीन येथील पोर्ट ट्रस्टच्या सुसज्ज इमारतींपैकी ३ निवासी इमारतींतील १२८ गाळे गरीब कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे टाटामध्ये येणाऱ्या अतिरिक्त रुग्णांची सोय होणार आहे. सध्या ७२ कॅन्सरग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची या ठिकाणी सोय होऊ शकते. या केंद्रात आता टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरीब मुलांची आणि त्यांच्या पालकांची निवासाची व्यवस्था करता येणार आहे.
या ठिकाणी त्यांच्यासाठी घरगुती वातावरण निर्माण करण्यात आले आहे. इनडोअर खेळांचीही सुविधा आहे. (प्रतिनिधी)

नानांच्या डोळ्यांत तरळले अश्रू
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी कॅन्सरग्रस्त मुलांसोबत बराच वेळ घालवला, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत बोलत असताना नानांच्या डोळ्यांत अश्रू आल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Shishu Health Center hope ray - Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.