शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : फॅन्सी नंबरप्लेट वाहनांवर कारवाई, दहा हजार रुपये दंडाची वसुली, वाहतूक शाखेच्या पोलिसांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 17:25 IST

वाहनांना नियमबाह्य व अनियमित नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई केली. यावेळी १५० वाहनांवर कारवाई करून दहा हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देकोल्हापुरात फॅन्सी नंबरप्लेट वाहनांवर कारवाईवाहतूक शाखेच्या पोलिसांची मोहीमदहा हजार रुपये दंडाची वसुली

कोल्हापूर : वाहनांना नियमबाह्य व अनियमित नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई केली. यावेळी १५० वाहनांवर कारवाई करून दहा हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.‘सरपंच’, ‘दादा’,‘मामा’, ‘आई’, ‘राम’, ‘पाटील’, ‘बॉस’,यासह अन्य फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्तपणे वाहनचालक शहरात वावरत असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या निदर्शनास आले होते.

त्यामुळे त्यांनी चार दिवसांपूर्वी सर्व नागरिक, वाहनचालकांनी वाहन चालविताना विहीत नमुन्यातील मापदंडाप्रमाणे वाहनांचे नंबरप्लेट बसवून आपले सोबत योग्य ती कागदपत्रे जवळ बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन केले होते.सोमवारी शिवाजी पूल, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका परिसरात वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत वाहतूक नियमांचा भंग करणे, नियमबाह्य नंबरप्लेट वापरणे, वाहन नोंदणी न करताच वापरणे आदींवर कारवाई करण्यात आली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtraffic policeवाहतूक पोलीस