शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कोल्हापूर : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी एजंटाचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 11:15 IST

२५ लाखांच्या खंडणीसाठी कळंबा येथून निगवे खालसा येथील फायनान्स कंपनीच्या एजंटाचे अपहरण करून ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आठजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ३) गुन्हा दाखल झाला. संशयित विशाल शिंदे (वय ३२), कांबळे, राजा, गणीभाई यांच्यासह आठजणांचा यात समावेश आहे.

ठळक मुद्दे पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी एजंटाचे अपहरण करून मारहाणमारहाण केल्याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : कळंबा येथून निगवे खालसा येथील फायनान्स कंपनीच्या एजंटाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आठजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ३) गुन्हा दाखल झाला. संशयित विशाल शिंदे (वय ३२), कांबळे, राजा, गणीभाई यांच्यासह आठजणांचा यात समावेश आहे.अधिक माहिती अशी, विजय निवृत्ती कांबळे (३८, रा. निगवे खालसा, ता. करवीर) हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बॅँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्यांतील कर्ज मिळवून देण्यासाठी लोकांना मदत करतात. या माध्यमातून त्यांना कमिशन मिळते.

गुरुवारी (दि. ३) त्यांना विशाल शिंदे याने फोन करून कळंबा येथील साई मंदिरासमोर बोलावून घेतले.  येथील मंगल कार्यालयासमोर लावलेल्या कारमध्ये आठजणांनी जबरदस्तीने त्यांना बसविले.

तेथून पाचगाव, आर. के.नगर, विद्यापीठ, चित्रनगरी, गोकुळ शिरगाव, फाईव्ह स्टार एमआयडीसी या मार्गावरून नेऊन स्टीलच्या पाईपने बेदम मारहाण केली. शिंदे याने तू, कर्ज प्रकरणामध्ये भरपूर पैसे मिळविले आहेस. आता आम्हाला २५ लाख रुपये दे, नाहीतर तुला ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची धमकी दिली.

त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या खिशातील साडेचार हजार, एटीएम कार्डवरून चार हजार व मित्र बाबासाहेब कांबळे यांचेकडून सायबर चौक येथे अनोळखी व्यक्तीकडून ७२ हजार असे सुमारे ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांना सोडून दिले. भयभीत झालेल्या विजय कांबळे यांनी याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcrimeगुन्हे