शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शेतकरी संघ निवडणुकीसाठी २५ हजारांचे शेअर्स लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:05 IST

शेतकरी सहकारी संघाची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती व संस्था सभासदांना आता किमान २५ हजारांचे शेअर्स हवेत, तसा पोटनियम दुरुस्तीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. त्याचबरोबर व्यक्ती सभासदांना वर्षाला किमान २५ हजारांची, तर संस्थांना एक लाख रुपये किमतीचा माल संघाकडून खरेदी करावा लागणार आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघ निवडणुकीसाठी २५ हजारांचे शेअर्स लागणार२८ आॅगस्टच्या सभेत पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव : सभासदांमधून विरोध

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती व संस्था सभासदांना आता किमान २५ हजारांचे शेअर्स हवेत, तसा पोटनियम दुरुस्तीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. त्याचबरोबर व्यक्ती सभासदांना वर्षाला किमान २५ हजारांची, तर संस्थांना एक लाख रुपये किमतीचा माल संघाकडून खरेदी करावा लागणार आहे. सत्तारूढ गटाच्या या निर्णयाने सामान्य सभासद निवडणुकीच्या प्रक्रियेपासून बाजूला फेकल्याने या पोटनियम दुरुस्तीला विरोध होऊ लागला आहे.शेतकरी संघाची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २८ आॅगस्टला दुपारी एक वाजता शाहू स्मारक भवन येथे होत आहे. संघाच्या सत्तारूढ गटाने निवडणुकीसाठी पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. पूर्वी संघाची शेअर्स रक्कम शंभर रुपये होती. मध्यंतरी त्यामध्ये वाढ करून ती पाचशे रुपये केली.

यापूर्वी संघाची निवडणूक लढविण्यासाठी व्यक्ती सभासदाने वर्षभरात एक हजाराचा, तर संस्था सभासदांनी पाच हजारांचा माल संघाच्या दुकानातून खरेदी करणे आवश्यक होते.

आता सत्तारूढ गटाने हा पोटनियम बदलण्याचा घाट घातला आहे. निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती सभासदाच्या नावावर किमान २५ हजारांचे (पाचशे रुपये दर्शनी किमतीचे ५० शेअर्स) शेअर्स व प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५ हजार ५पयांची खरेदी करणे बंधनकारक केले आहे.

त्याचबरोबर संस्था सभासदांनी २५ हजारांचे शेअर्स व प्रत्येक आर्थिक वर्षात एक लाख रुपये किमतीचा माल खरेदी करावा लागणार आहे. याबाबतचा पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव सत्तारूढ गटाने सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे.

या निर्णयामुळे सामान्य सभासदाला निवडणुकीलाच उभे राहता येणार नाही. मुळात ज्या उद्देशाने स्वर्गीय तात्यासाहेब मोहिते यांच्यासह दिग्गज नेत्यांनी शेतकरी संघ वाढविला. त्या उद्देशाला सध्याचे विश्वस्त तिलांजली देत असल्याची टीका सभासदांमधून होत आहे.

सभासदांना १३ टक्के लाभांशसंघाला २०१७-१८ या आर्थिक वर्षात ४२ लाख ४९ हजारांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यातून सभासदांना १३ टक्के लाभांश दिला जाणार आहे. गेल्या वर्षी १२ टक्के लाभांश दिला होता. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर