शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : उद्योजकांच्या भल्यासाठी १९ टक्के वीज बिल शेतकऱ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 10:58 IST

उपसा जलसिंचन कालवे योजनेचे ८१ टक्के वीज बिल त्या प्रकल्पामार्फत भरण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, उर्वरित १९ टक्के वीज बिल तरी शेतकऱ्यांच्या माथी का मारता, असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थित केला. उद्योजकांच्या भल्यासाठी हे १९ टक्के वीज बिल शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारले जात असल्याचा आरोप करत याविरोधात पुन्हा लढा उभारणार असल्याचे त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देभारत पाटणकर यांचा आरोप, उपसा जलसिंचन कालवे योजनाचार वर्षे आम्ही संघर्ष केला, पुन्हा लढा उभारणार : पाटणकर गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलन, २१ जानेवारी रोजी कोल्हापुरात बैठक जानेवारीमध्ये सातारा जिल्ह्यात श्रमिक मुक्ती दलाचे राज्य अधिवेशन

कोल्हापूर : उपसा जलसिंचन कालवे योजनेचे ८१ टक्के वीज बिल त्या प्रकल्पामार्फत भरण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, उर्वरित १९ टक्के वीज बिल तरी शेतकऱ्यांच्या माथी का मारता, असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थित केला. उद्योजकांच्या भल्यासाठी हे १९ टक्के वीज बिल शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारले जात असल्याचा आरोप करत याविरोधात पुन्हा लढा उभारणार असल्याचे त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.डॉ. पाटणकर म्हणाले, गेली चार वर्षे यासाठी आम्ही संघर्ष केला. वास्तविक याआधीच्या सरकारने आणि विद्यमान सरकारनेही आधीच हा निर्णय घेणे आवश्यक होते. या सरकारने तो घेतला याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो; पण लढा येथे संपलेला नाही.एकूण वीज बिलाच्या ८१ टक्के बिल आता त्या-त्या प्रकल्पांच्या माध्यमातून शासन भरणार आहे.

सर्व वीज बिल प्रकल्पांच्या माध्यमातून भरणे शक्य आहे, तसा अहवाल त्या-त्या विभागांनी शासनाला दिला आहे. आम्ही याबाबतच्या बैठकांमध्ये हे शासकीय अधिकाऱ्यांना पटवून दिले आहे तरीही शासनाने या बिलाच्या १९ टक्के बिल शेतकऱ्यांनी भरावे, असा निर्णय घेतला आहे. मात्र, या विरोधात आम्ही आंदोलन उभारणार आहोत.

यावेळी राज्य सचिव संपत देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर (सातारा), प्रा. टी. एल. पाटील, मोहन अनपट (सोलापूर), प्रकाश सोरटे, मारुती पाटील, शंकर पाटील, दिनकर पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलनडॉ. पाटणकर म्हणाले, दहा हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेली अंबाबाई आहे. ती गणमाता आहे. त्या काळामध्ये सामूहिक लोकशाहीवर भर होता. सर्व येणारे उत्पन्न हे देवीच्या साक्षीने वाटून घेण्याची पद्धत होती. सध्याच्या जत्रा हे याचेच प्रतीक आहे.

रा. चिं. ढेरे, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. शरद पाटील या सर्वांनी तशी मांडणी केली आहे म्हणूनच अंबामाता आणि तिच्या मुला समान असलेले भाविकांच्यामध्ये कुणीही दलाल नकोत, अशी आमची भूमिका आहे म्हणूनच पंढरपूरच्या धर्तीवर येथील अंबाबाई मंदिरातही व्यवस्था असावी, यासाठी गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलन उभारणार आहोत. दि. २१ जानेवारी २०१८ रोजी कोल्हापुरातच याबाबत बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल.

जानेवारीमध्ये सातारा जिल्ह्यात अधिवेशनपाटण तालुक्यातील सावरघर येथे दि. ६, ७, ८ जानेवारी २०१८ रोजी श्रमिक मुक्ती दलाचे राज्य अधिवेशन होणार असून पर्यायी विकास आराखडा, समन्यायी पाणी वाटप धोरणाची राज्यभर अंमलबजावणी, पुरुषसूक्तानुसार होणाऱ्या विठ्ठलपूजेला विरोध, नितीन आगेचे मारेकरी निर्दोष ठरल्याबद्दल जानेवारीअखेरीस मोर्चा, कंपन्यांच्या सीएसआर निधीतून प्रकल्पग्रस्तांसाठी उद्योग आदी विषयांवर या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर