शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोल्हापूर : रोज दहा हजार घरांचे सर्वेक्षण झाले पाहिजे, सीईओंची ग्रामसेवकांना सूचना, अध्यक्षांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:22 IST

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा मागे पडत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये रोज दहा हजार घरांचे सर्वेक्षण करून या महिनाअखेर दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांवर आहे, अशा स्पष्ट शब्दांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ग्रामसेवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

ठळक मुद्देरोज दहा हजार घरांचे सर्वेक्षण झाले पाहिजेसीईओंची ग्रामसेवकांना सूचना, अध्यक्षांनी घेतला आढावा

कोल्हापूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा मागे पडत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये रोज दहा हजार घरांचे सर्वेक्षण करून या महिनाअखेर दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांवर आहे, अशा स्पष्ट शब्दांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ग्रामसेवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.या सर्वेक्षणासाठी ३० आॅक्टोबर ही अंतिम मुदत असताना कोल्हापूर जिल्ह्यात या कामाचा उठाव न झाल्याने शुक्रवारी दुपारी अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मित्तल यांनी या कामांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, अधीक्षक रणजित श्ािंदे उपस्थित होते.अध्यक्षा महाडिक म्हणाल्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हाच गावपातळीवरील ग्रामविकासातील महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या माध्यमातूनच सर्व योजना राबविल्या जात असताना अशा महत्त्वाच्या कामात आपण मागे राहणे योग्य नाही. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत या कामामध्ये हयगय करू नका.या योजनेतून जिल्ह्यातून १ लाख ५९ हजार जणांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील १ लाख ४० हजार जणांचे सर्वेक्षण होणे बाकी आहे. या कामासाठी केवळ बारा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे रोज दहा हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. शासन आदेशानुसार ग्रामसेवकांना हे काम करावे लागणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.ग्रामसेवक संघटना पदाधिकाऱ्यांनी यावेळी काही अडचणी मांडल्या. आॅनलाईन सर्वेक्षणासाठीची आवश्यक यंत्रणा वेगवान हवी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामसेवक संघटनांचे पदाधिकारी साताप्पा मोहिते, ए. एस. कटारे, नारायण मगदूम, के. आर. किरूळकर, एस. डी. पाटील, एन. व्ही. कुंभार, विश्वास पाटील सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर