‘कोजिमाशि’तर्फे गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:16+5:302021-02-05T07:14:16+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेच्या सरवडे (ता. राधानगरी) शाखेच्यावतीने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आर. डी. ...

‘कोजिमाशि’तर्फे गुणवंतांचा सत्कार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेच्या सरवडे (ता. राधानगरी) शाखेच्यावतीने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आर. डी. पाटील होते.
यावेळी नवनिर्वाचित मुख्याध्यापक, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबईचे कौन्सिल सदस्य, डी. बी. पाटील विचारमंच पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिवम प्रतिष्ठान राशिवडेचे पुरस्कार प्राप्त शिक्षक, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य आदींचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संचालक राजेंद्र रानमाळे म्हणाले, तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी संस्था भक्कम पायावर उभी केली असून सभासदांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या आहेत.
प्रास्ताविक संस्थेचे शाखा अध्यक्ष अरविंद किल्लेदार यांनी केले. बी. डी. खतकर, वाय. एम. सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. एस. के. पाटील, ए. आर. पाटील, बी. एन. मगदूम, दत्तात्रय कांबळे, सत्यवान पाटील, किशोर बरगे, सचिन पाटील, प्रतिभा पाटील, रेखा पाटील, सुरेश रेपे, एन. एन. कांबळे उपस्थित होते.
सूत्रसंचालन संजय डवर यांनी केले. आभार जी. आर. पाटील यांनी मानले.
फोटो ओळी : ‘कोजिमाशि’ पतसंस्था शाखा सरवडे (ता. राधानगरी) च्यावतीने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद किल्लेदार, बी. डी. खतकर, राजेंद्र रानमाळे, एस. के. पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-३१०१२०२१-कोल-शिक्षक पतसंस्था)