कोडोलीत पंचवीस गुंठ्यात पाच क्विंटल तिळाचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST2021-05-17T04:21:56+5:302021-05-17T04:21:56+5:30
कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे अत्यंत अल्प खर्चात व केवळ ८० दिवसांच्या कालावधीत पंचवीस गुंठ्याच्या शेतजमिनीत ...

कोडोलीत पंचवीस गुंठ्यात पाच क्विंटल तिळाचे उत्पादन
कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे अत्यंत अल्प खर्चात व केवळ ८० दिवसांच्या कालावधीत पंचवीस गुंठ्याच्या शेतजमिनीत पाच क्विंटल तिळाचे उत्पादन घेण्यात आले. यासाठीचा खर्च वजा जाता पंचेचाळीस हजार रुपये निवळ नफा येथील सुभाष जद या शेतकऱ्याने मिळवला आहे.
जानेवारी अखेरीस ऊस गेला असल्याने गहू, हरभरा या पिकांच्या पेरणीचा हंगामा संपला असल्याने तीळ पीक घेण्याचा निर्णय जद यांनी घेतला. या पिकाला कोणत्याही प्रकारची लागवड न घालता, एकवेळ भागलन करण्यात आली होती व केवळ पाचवेळा पाणी देण्यात आले होते. हे पीक केवळ ८० दिवसांमध्ये घेण्यात आले असून, कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक आहे. तीळ हा मसाल्यात वापरण्यात येणारा पदार्थ आहे शिवाय आयुर्वेदातही तीळ तेलाचा प्राधान्याने वापर होत आहे. त्यामुळे मागणीही कायम आहे. या अनुषंगाने तीळ पिकाची लागवड केल्याचे सुभाष जद यानी सांगितले.
कोडोली येथील राजवर्धन कृषी सेवा केंद्राचे निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कल्याण कंपनीच्या ‘गुजरात - ४’ या वाणाची लागवड करण्यात आली होती. आजच्या बाजारभावाने सुमारे साठ हजार रूपयांचे उत्पादन झाले व खर्च वजा जाता तीन महिन्यात ४५ हजार रूपयांचा नफा झाल्याचे शेतकरी सुभाष जद यांनी सांगितले.
१६ कोडोली
कोडोली (ता. पन्हाळा) येथे तीळ पिकाची काढणी करताना शेतकरी बांधव.