नूल : कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून गडहिंग्लज पूर्व भागातील माध्यमिक इयत्ता नववी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून, विद्यार्थी उपस्थितीदेखील समाधानकारक असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. एकंदरीत, गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांतून पुन्हा गजबजाट सुरू झाला असून विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गातून उत्साहाचे वातावरण आहे. इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल, टेक्निकल व ज्युनिअर कॉलेज, श्री रामलिंग हायस्कूल या नूलच्या दोन शाळा; न्यू इंग्लिश स्कूल खणदाळ, श्रीराम हायस्कूल- नांगनूर, शिवराज हायस्कूल- नंदनवाड, एस. एम. हायस्कूल- बसर्गे, न्यू इंग्लिश स्कूल- चन्नेकुप्पी, मुगळी, जरळी हायस्कूल-जरळी, एस. डी. हायस्कूल- मुत्नाळ, आदी शाळा सुरू झाल्या आहेत.
नूल पूर्व भागातील माध्यमिक शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST