राजेंद्रनगरात तरुणावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:21+5:302021-07-04T04:17:21+5:30
कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार राजेंद्रनगरात घडला. शंकर सुनील गायकवाड (वय ...

राजेंद्रनगरात तरुणावर चाकू हल्ला
कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार राजेंद्रनगरात घडला. शंकर सुनील गायकवाड (वय २१, रा. सर्वपल्ली राधाकृष्ण शाळेच्या पिछाडीस, राजेंद्रनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शंकर गायकवाड आणि अमर माने यांच्यात पूर्वीच्या भांडणावरून वाद धुमसत होता. शंकर गायकवाड हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या घराबाहेर दारात खुर्ची टाकून मोबाईल गेम खेळत होते. बेसावध असणा-या गायकवाड यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी पाठीमागून अचानक हल्ला केला. दोन युवकांनी गायकवाड यांच्या पाठीत व हातावर धारदार हत्याराने सपासप वार केले. हल्ल्यानंतर दोघेही हल्लेखोर पळून गेले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर राजेंद्रनगर परिसरात खळबळ माजली. जखमी गायकवाड याला नातवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अमर माने व सतीश माने (दोघेही रा. राजेंद्रनगर) या दोघा संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जखमी गायकवाड याच्या डाव्या हातावर तसेच पाठीत हत्याराच्या खोलवर जखमा झाल्या आहेत.