राजेंद्रनगरात जुन्या भांडणातून तरुणांवर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST2021-09-25T04:24:01+5:302021-09-25T04:24:01+5:30
कोल्हापूर : मागील भांडणात वडिलांचे नाव का घातलेस, असे म्हणत चाकूने वार करून जखमी केले. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ...

राजेंद्रनगरात जुन्या भांडणातून तरुणांवर चाकू हल्ला
कोल्हापूर : मागील भांडणात वडिलांचे नाव का घातलेस, असे म्हणत चाकूने वार करून जखमी केले. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा नोंद झाला. शंकर सुनील गायकवाड (वय ३३, रा. राजेंद्रनगर) याने फिर्याद दिली. अमर सतीश माने, सतीश माने, संतोष मोटे, देवीदास सकट, आकाश गस्ते, रवि राजू भोसले, अमन शेख (सर्व रा. राजेंद्रनगर) या संशयितावर गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, फिर्यादी गायकवाड हा बुधवारी सायंकाळी राजेंद्रनगरातील रस्त्यावर उभा होता. दरम्यान संशयित अमर माने याने तू मागील भांडणाच्या वेळी माझ्या वडिलांचे नाव का घातलेस असे म्हणत त्याच्यावर चाकूने वार केले. अन्य सहा संशयितांनी चाकू, काठी आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाला. या मारहाणीनंतरही अमर माने व सकट यांनी फिर्यादीला तुला बघून घेतो, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याबाबतच्या गुन्ह्याची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली असून, तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.